< उत्पत्ति 10 >

1 नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
Teć są rodzaje synów Noego, Sema, Chama i Jafeta, którym się narodziło synów po potopie.
2 याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
Synowie Jafetowi Gomer, i Magog, i Madai, i Jawan, i Tubal, i Mesech, i Tyras.
3 गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.
A synowie Gomerowi: Aschenaz, i Ryfat, i Togorma.
4 यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.
A synowie Jawanowi: Elisa, i Tarsis, Cytym, i Dodanim.
5 यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.
Od tych rozdzielone są wyspy narodów po swych ziemiach; każdy według języka swego, i według pokolenia swego, w narodziech swoich.
6 हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.
A synowie Chamowi: Chus, i Micraim, i Put, i Chanaan.
7 कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.
Synowie zaś Chusowi: Seba, i Hewila, i Sabta, i Regma, i Sabtacha. A synowie Regmy: Seba i Dedan.
8 कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
A Chus spłodził Nemroda, który począł być możnym na ziemi.
9 तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
Ten był możnym myśliwcem przed obliczem Pańskiem; przetoż się mówi: Jako Nemrod możny myśliwiec przed Panem.
10 १० त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.
A początek królestwa jego był Babel, i Erech, i Achad, i Chalne w ziemi Senaar.
11 ११ त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली
Z tej ziemi wyszedł Assur, i zbudował Niniwe, i Rechobot miasto, i Chale.
12 १२ आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.
Także Resen, między Niniwe i między Chale; to miasto jest wielkie.
13 १३ मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
Micraim też spłodził Ludyma, i Hananima, i Laubima, i Neftuhyma.
14 १४ पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला.
I Patrusyma, i Chasluchyma, ( z których poszli Filistynowie, ) i Kaftoryma.
15 १५ कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,
Chanaan też spłodził Sydona pierworodnego swego, i Heta.
16 १६ तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
I Jebusa, i Amorra, i Gergesa.
17 १७ हिव्वी, आर्की व शीनी
I Hewa, i Archa, i Syma.
18 १८ अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.
I Arada, i Samara, i Chamata, skąd się potem rozrodziły domy Chananejczyków.
19 १९ कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
A granice Chananejskie były od Sydonu idąc do Gerary, aż do Gazy, aż wnijdziesz do Sodomy i Gomorry, i Adamy, i Seboima, aż do Lazy.
20 २० कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.
Ci są synowie Chamowi w familijach swych, w językach swych, w ziemiach swych, w narodziech swych.
21 २१ शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
A Semowi, ojcu wszystkich synów Heberowych, bratu Jafeta starszego, urodzili się synowie.
22 २२ शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.
Synowie Semowi: Elam i Assur, i Arfachsad, i Lud, i Aram.
23 २३ अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.
Synowie zaś Aramowi: Hus, i Hul, i Geter, i Mesech.
24 २४ अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.
Arfachsad zaś spłodził Selecha, a Selech spłodził Hebera.
25 २५ एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
A Heberowi urodzili się dwa synowie: imię jednemu Faleg, iż za dni jego rozdzielona jest ziemia; a imię brata jego Jektan.
26 २६ यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह
Jektan też spłodził Elmodada, i Salefa, i Hasarmota, i Jarecha.
27 २७ हदोराम, ऊजाल, दिक्ला
I Adorama, i Uzala, i Dekla.
28 २८ ओबाल, अबीमाएल, शबा,
I Hebala, i Abymaela, i Sebaja.
29 २९ ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
I Ofira, i Hewila, i Jobaba: ci wszyscy są synowie Jektanowi.
30 ३० त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता.
A było mieszkanie ich od Mescha idąc, do góry Sefar na wschód słońca.
31 ३१ आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र.
Cić są synowie Semowi w domach swych, w językach swych, w ziemiach swych, w narodziech swych.
32 ३२ पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.
Teć są domy synów Noego, według pokolenia ich, i w narodziech ich, i od nich rozdzielone są narody na ziemi po potopie.

< उत्पत्ति 10 >