< उपदेशक 6 >

1 जे मी भूतलावर एक अरिष्ट पाहिले. आणि ते मनुष्यासाठी भारीच असते.
יֵ֣שׁ רָעָ֔ה אֲשֶׁ֥ר רָאִ֖יתִי תַּ֣חַת הַשָּׁ֑מֶשׁ וְרַבָּ֥ה הִ֖יא עַל־הָאָדָֽם׃
2 देव कोणा मनुष्यास खूप संपत्ती, धनदौलत आणि मानसन्मान एवढा देतो की तो मनुष्य जे इच्छितो ते सर्व त्यास मिळते, कसलीही उणीव पडत नाही. परंतु नंतर देव त्यास त्याचा आनंद घेण्याची शक्ती देत नाही. त्याऐवजी कोणीतरी अनोळखी त्या गोष्टींचा उपयोग करतो. हे व्यर्थ आहे, अतिशय वाईट पीडा आहे.
אִ֣ישׁ אֲשֶׁ֣ר יִתֶּן־ל֣וֹ הָאֱלֹהִ֡ים עֹשֶׁר֩ וּנְכָסִ֨ים וְכָב֜וֹד וְֽאֵינֶ֨נּוּ חָסֵ֥ר לְנַפְשׁ֣וֹ ׀ מִכֹּ֣ל אֲשֶׁר־יִתְאַוֶּ֗ה וְלֹֽא־יַשְׁלִיטֶ֤נּוּ הָֽאֱלֹהִים֙ לֶאֱכֹ֣ל מִמֶּ֔נּוּ כִּ֛י אִ֥ישׁ נָכְרִ֖י יֹֽאכֲלֶ֑נּוּ זֶ֥ה הֶ֛בֶל וָחֳלִ֥י רָ֖ע הֽוּא׃
3 जर कोणा मनुष्याने शंभर मुलांस जन्म दिला आणि पुष्कळ वर्षे जगला आणि त्याच्या आयुष्याचे वर्षे पुष्कळ असली, परंतु त्याचा जीव चांगल्या सुखाने समाधान पावला नाही आणि त्यास सन्मानाने दफन केले नाही. तर त्याच्यापेक्षा मृत जन्मलेले बाळ खूप बरे आहे. असे मी म्हणतो.
אִם־יוֹלִ֣יד אִ֣ישׁ מֵאָ֡ה וְשָׁנִים֩ רַבּ֨וֹת יִֽחְיֶ֜ה וְרַ֣ב ׀ שֶׁיִּהְי֣וּ יְמֵֽי־שָׁנָ֗יו וְנַפְשׁוֹ֙ לֹא־תִשְׂבַּ֣ע מִן־הַטּוֹבָ֔ה וְגַם־קְבוּרָ֖ה לֹא־הָ֣יְתָה לּ֑וֹ אָמַ֕רְתִּי ט֥וֹב מִמֶּ֖נּוּ הַנָּֽפֶל׃
4 जसे ते जन्मलेले बाळ निरर्थक आहे आणि अंधकारात नाहीसे होते व त्याचे नाव लपलेलेच राहते.
כִּֽי־בַהֶ֥בֶל בָּ֖א וּבַחֹ֣שֶׁךְ יֵלֵ֑ךְ וּבַחֹ֖שֶׁךְ שְׁמ֥וֹ יְכֻסֶּֽה׃
5 त्या बाळाने कधीही सूर्य पाहिला नाही किंवा त्यास काहीच माहीत नाही, त्यास त्या मनुष्यापेक्षा अधिक विसावा आहे.
גַּם־שֶׁ֥מֶשׁ לֹא־רָאָ֖ה וְלֹ֣א יָדָ֑ע נַ֥חַת לָזֶ֖ה מִזֶּֽה׃
6 तो मनुष्य कदाचित दोन हजार वर्षे जरी जगला. पण तो चांगल्या गोष्टींचा उपभोग घेण्यास शिकला नाही तर प्रत्येकजण ज्या जागी जातात त्याच जागी तो पण जाईल.
וְאִלּ֣וּ חָיָ֗ה אֶ֤לֶף שָׁנִים֙ פַּעֲמַ֔יִם וְטוֹבָ֖ה לֹ֣א רָאָ֑ה הֲלֹ֛א אֶל־מָק֥וֹם אֶחָ֖ד הַכֹּ֥ל הוֹלֵֽךְ׃
7 मनुष्याचे सर्व श्रम पोटासाठी आहेत. तरी त्याची भूक भागत नाही.
כָּל־עֲמַ֥ל הָאָדָ֖ם לְפִ֑יהוּ וְגַם־הַנֶּ֖פֶשׁ לֹ֥א תִמָּלֵֽא׃
8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो? त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्यास तरी काय फायदा?
כִּ֛י מַה־יּוֹתֵ֥ר לֶחָכָ֖ם מִֽן־הַכְּסִ֑יל מַה־לֶּעָנִ֣י יוֹדֵ֔עַ לַהֲלֹ֖ךְ נֶ֥גֶד הַחַיִּֽים׃
9 जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे. हे सुध्दा वाफच आहे. व वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
ט֛וֹב מַרְאֵ֥ה עֵינַ֖יִם מֵֽהֲלָךְ־נָ֑פֶשׁ גַּם־זֶ֥ה הֶ֖בֶל וּרְע֥וּת רֽוּחַ׃
10 १० जे काही झाले त्याचे नाव पूर्वीच ठेवलेले आहे आणि मनुष्य काय आहे हेही कळलेले आहे. त्याजहून जो समर्थ त्याच्याशी त्यास झगडता येणार नाही.
מַה־שֶּֽׁהָיָ֗ה כְּבָר֙ נִקְרָ֣א שְׁמ֔וֹ וְנוֹדָ֖ע אֲשֶׁר־ה֣וּא אָדָ֑ם וְלֹא־יוּכַ֣ל לָדִ֔ין עִ֥ם שהתקיף מִמֶּֽנּוּ׃
11 ११ अधिक शब्द बोलण्याने अधिक निरर्थकता वाढते. त्यामध्ये मनुष्यास काय लाभ?
כִּ֛י יֵשׁ־דְּבָרִ֥ים הַרְבֵּ֖ה מַרְבִּ֣ים הָ֑בֶל מַה־יֹּתֵ֖ר לָאָדָֽם׃
12 १२ मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो. त्यामध्ये त्यास काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? कारण त्याच्या मरणानंतर पृथ्वीवर काय होईल हे मनुष्यास कोण सांगेल?
כִּ֣י מִֽי־יוֹדֵעַ֩ מַה־טּ֨וֹב לָֽאָדָ֜ם בַּֽחַיִּ֗ים מִסְפַּ֛ר יְמֵי־חַיֵּ֥י הֶבְל֖וֹ וְיַעֲשֵׂ֣ם כַּצֵּ֑ל אֲשֶׁר֙ מִֽי־יַגִּ֣יד לָֽאָדָ֔ם מַה־יִּהְיֶ֥ה אַחֲרָ֖יו תַּ֥חַת הַשָּֽׁמֶשׁ׃

< उपदेशक 6 >