< उपदेशक 11 >

1 आपली भाकर जलावर सोड. कारण पुष्कळ दिवसानी तुला ते पुन्हा मिळेल.
Svoj kruh vrzi na vode, kajti našel ga boš po mnogih dneh.
2 तू सात आठ लोकांस वाटा दे. कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.
Daj delež sedmim in tudi osmemu, kajti ne veš kakšno zlo bo na zemlji.
3 जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
Če so oblaki polni dežja, se izlijejo na zemljo, in če drevo pade proti jugu ali proti severu, na kraj, kamor drevo pade, tam bo.
4 जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही. जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही.
Kdor opazuje veter, ne bo sejal in kdor se ozira na oblake, ne bo žel.
5 जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही, आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.
Kakor ne veš kakšna je pot duha niti kako rastejo kosti v maternici tiste, ki je z otrokom; tako ne poznaš del Boga, ki dela vse.
6 सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
Zjutraj sej svoje seme in zvečer ne zadržuj svoje roke, kajti ne veš, ali bo uspevalo to ali ono, ali pa bosta oba enako dobra.
7 प्रकाश खरोखर गोड आहे, आणि सूर्य पाहणे डोळ्यांस आनंददायक गोष्ट आहे.
Resnično, svetloba je prijazna in prijetna stvar je za oči, da gledajo sonce,
8 जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो, पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो, कारण ते पुष्कळ होतील. जे सर्व येते ते व्यर्थच आहे.
toda če človek živi mnogo let in se veseli v njih vseh, naj se vendar spomni dni teme, kajti mnogo jih bo. Vse, kar prihaja, je ničevost.
9 हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो, आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.
Razveseli se, oh mladenič, v svoji mladosti in naj te tvoje srce spodbuja v dneh tvoje mladosti in hodi po poteh svojega srca in za pogledom svojih oči; toda vedi, da te bo Bog zaradi vseh teh stvari privedel v obsodbo.
10 १० यास्तव आपल्या मनातून राग दूर कर, आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको. कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.
Zatorej od svojega srca odstrani bridkost in odloži zlo od svojega mesa, kajti otroštvo in mladost sta ničevost.

< उपदेशक 11 >