< 2 इतिहास 13 >

1 इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
Torej v osemnajstem letu kralja Jerobeáma, je nad Judom začel kraljevati Abíja.
2 त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली.
Tri leta je kraljeval v Jeruzalemu. Ime njegove matere je bilo Mihajá, Uriélova hči iz Gíbee. In bila je vojna med Abíjem in Jerobeámom.
3 अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
Abíja se je postrojil z vojsko hrabrih bojevnikov, celó štiristo tisoč izbranih mož. Tudi Jerobeám se je postrojil zoper njega z osemsto tisoč izbranimi možmi, ki so bili močni junaški možje.
4 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,
Abíja je stal na gori Cemarájim, ki je na gori Efrájim in rekel: »Poslušaj me, ti Jerobeám in ves Izrael,
5 दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
ne veste, da je Gospod, Izraelov Bog, dal kraljestvo nad Izraelom Davidu na veke, celó njemu in njegovim sinovom s solno zavezo?
6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता.
Vendar je Nebátov sin Jerobeám, služabnik Davidovega sina Salomona, vstal in se uprl zoper svojega gospoda.
7 मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
In k njemu so bili zbrani praznoglavi možje, Beliálovi otroci in so se okrepili zoper Salomonovega sina Rehabáma, ko je bil Rehabám mlad in nežnega srca in se jim ni mogel zoperstaviti.
8 आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
In sedaj se vi mislite zoperstaviti Gospodovemu kraljestvu v roki Davidovih sinov. Vas je velika množica in tam sta z vami zlati teleti, katera vam je Jerobeám naredil za bogova.
9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत: वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो.
Mar niste vrgli ven Gospodove duhovnike, Aronove sinove in Lévijevce in ste si naredili duhovnike po načinu narodov drugih dežel? Tako da kdorkoli prihaja, da sebe umésti z mladim bikcem in sedmimi ovni, isti lahko postane duhovnik tistim, ki so ne-bogovi.
10 १० “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
Toda kar se nas tiče, je Gospod naš Bog in mi ga nismo zapustili, in duhovniki, ki služijo Gospodu, so Aronovi sinovi in Lévijevci čakajo na svoj posel.
11 ११ परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.
Vsako jutro in vsak večer Gospodu zažigajo žgalne daritve in dišeče kadilo. Tudi hlebe navzočnosti postavljajo na čisto mizo in zlati svečnik z njegovimi svetilkami prižigajo vsak večer. Kajti mi se držimo naročila Gospoda, našega Boga, toda vi ste ga zapustili.
12 १२ पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही.”
Glejte, sam Bog je z nami za našega poveljnika in njegovi duhovniki z donenjem trobent, da zoper vas zatrobijo alarm. Oh Izraelovi otroci, ne borite se zoper Gospoda, Boga svojih očetov, kajti ne boste uspeli.«
13 १३ पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.
Toda Jerobeám je velel zasedi, da pride naokrog za njimi. Tako so bili pred Judom in zaseda je bila za njimi.
14 १४ यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले.
Ko je Juda pogledal nazaj, glej, bitka je bila spredaj in zadaj. Zavpili so h Gospodu in duhovniki so zatrobili s trobentami.
15 १५ मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.
Potem so možje iz Juda zakričali in ko so možje iz Juda zakričali, se je pripetilo, da je Bog udaril Jerobeáma in ves Izrael pred Abíjem in Judom.
16 १६ इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.
Izraelovi otroci so pobegnili pred Judom in Bog jih je izročil v njihovo roko.
17 १७ अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.
Abíja in njegovo ljudstvo jih je umorilo z velikim pokolom. Tako so tam padli umorjeni Izraelci, petsto tisoč izbranih mož.
18 १८ अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला.
Tako so bili Izraelovi otroci ob tistem času podjarmljeni, Judovi otroci pa so prevladali, ker so se zanašali na Gospoda, Boga svojih očetov.
19 १९ अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.
Abíja je zasledoval Jerobeáma in od njega vzel mesta: Betel z njegovimi mesti, Ješáno z njenimi mesti in Efrón z njegovimi mesti.
20 २० अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला.
Niti ni Jerobeám ponovno obnovil moči v Abíjevih dneh, in Gospod ga je udaril in je umrl.
21 २१ अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या.
Toda Abíja je postal mogočen in poročil štirinajst žena ter zaplodil dvaindvajset sinov in šestnajst hčera.
22 २२ इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
Ostala Abíjeva dela, njegove poti in njegove besede so zapisane v zgodbi preroka Idója.

< 2 इतिहास 13 >