< 1 शमुवेल 17 >

1 तेव्हा पलिष्ट्यांनी आपले सैन्य लढाईसाठी एकवट केले. यहूदीयातील सोखो येथे एकत्र होऊन त्यांनी सोखो व अजेका यामध्ये अफस-दम्मीमात आपली छावणी दिली.
Torej Filistejci so zbrali skupaj svoje vojske za boj in zbrani so bili skupaj pri Sohóju, ki pripada Judu in se utaborili med Sohójem in Azéko, v Efes Damímu.
2 मग शौल व इस्राएलाची माणसे एकत्र मिळाली आणि त्यांनी एलाच्या खोऱ्यात छावणी करून पलिष्ट्यांशी लढण्यास सैन्यरचना केली.
Savel in Izraelovi možje so bili zbrani skupaj in se utaborili poleg doline Elá in se postrojili v boj zoper Filistejce.
3 तेव्हा पलिष्टी लोक एका बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि इस्राएली दुसऱ्या बाजूस डोंगरावर उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये खोरे होते.
Filistejci so stali na gori na eni strani, Izrael pa je stal na gori na drugi strani in med njimi je bila dolina.
4 गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती.
Iz tabora Filistejcev je prišel šampion iz Gata, po imenu Goljat, katerega višina je bila šest komolcev in pedenj.
5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते.
Na svoji glavi je imel čelado iz brona in oborožen je bil z verižnim plaščem. Teža plašča je bila pet tisoč šeklov brona
6 त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती.
Na svojih nogah je imel bronaste golenice in okrogel ščit iz brona med svojimi rameni.
7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता.
Palica njegove sulice je bila podobna tkalčevemu brunu in vrh njegove sulice je tehtal šeststo šeklov železa in nekdo, ki je nosil ščit, je šel pred njim.
8 तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, “तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक पुरुष निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो.
Stal je in klical Izraelovim vojskam ter jim rekel: »Zakaj ste prišli ven, da se postrojite za boj? Mar nisem jaz Filistejec, vi pa Savlovi služabniki? Izberite zase moža in naj pride dol k meni.
9 जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.”
Če se je zmožen bojevati z menoj in me ubiti, potem bomo mi vaši služabniki, toda če prevladam zoper njega in ga ubijem, potem boste vi naši služabniki in nam služili.«
10 १० आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.”
Filistejec je rekel: »Danes izzivam Izraelove vojske. Dajte mi človeka, da se lahko skupaj bojujeva.«
11 ११ जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले.
Ko so Savel in ves Izrael slišali te Filistejčeve besede, so bili zaprepadeni in silno prestrašeni.
12 १२ त्या वेळी दावीद हा यहूदाच्या बेथलेहेमच्या एफ्राथी इशाय नामे मनुष्याचा पुत्र होता; त्या मनुष्यास तर आठ पुत्र होते आणि शौलाच्या दिवसात तो म्हातारा झाला होता.
Torej David je bil sin tega Efratejca iz Judovega Betlehema, katerega ime je bilo Jese. Ta je imel osem sinov. V Savlovih dneh je mož odšel med može za starca.
13 १३ इशायाचे तीन जेष्ठ पुत्र शौलाच्या मागे लढाईला गेले आणि त्यांची नावे ही; पहिला अलीयाब व दुसऱ्याचे अबीनादाब व तिसऱ्याचे शम्मा.
Trije najstarejši Jesejevi sinovi so odšli in Savlu sledili v bitko. Imena njegovih treh sinov, ki so šli v bitko, so bila Eliáb, prvorojenec in poleg njega Abinadáb in tretji Šamá.
14 १४ दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते.
David je bil najmlajši in trije starejši so sledili Savlu.
15 १५ दावीद शौलापासून बेथेलहेमास आपल्या बापाची मेंढरे राखावयास जात येत असे.
Toda David je šel in se vrnil od Savla, da pri Betlehemu pase ovce svojega očeta.
16 १६ तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.
Filistejec se je približal zjutraj in zvečer in se nastavljal štirideset dni.
17 १७ इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा.
Jese je svojemu sinu Davidu rekel: »Vzemi sedaj za svoje brate škaf tega praženega zrnja in teh deset hlebov ter steci v tabor k svojim bratom
18 १८ हे लोण्याचे दहा गोळे त्यांच्या हजारांवरील सरदारास नेऊन दे आणि आपल्या भावांचा समाचार घेऊन त्यांची खूण आण.
in teh deset sirov odnesi k poveljniku njihove tisočnije in poglej, kako se imajo tvoji bratje in vzemi njihovo jamstvo.«
19 १९ तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.”
Torej Savel in oni in vsi Izraelovi možje so bili v dolini Elá, boreč se s Filistejci.
20 २० दावीद पहाटेस उठला आणि एका राखणाऱ्यांकडे मेंढरे सोपवून इशायाने सांगितल्या प्रमाणे सामान घेऊन गेला. तेव्हा सैन्य रणशब्द करून लढण्यास जात असता दावीद सैन्याच्या छावणी जवळ जाऊन पोहोचला.
David je vstal zgodaj zjutraj in pustil ovce s čuvajem in vzel ter odšel, kakor mu je Jese zapovedal. Prišel je k okopu, medtem ko je šla vojska naprej v boj in zavpila za boj.
21 २१ इस्राएल व पलिष्ट्यांनी त्यांच्या सेना लढाईसाठी समोरासमोर सज्ज् केल्या.
Kajti Izrael in Filistejci so se postrojili v bitko, vojska zoper vojsko.
22 २२ तेव्हा दावीद आपल्याजवळील सामान राखणाऱ्याच्या हाती ठेवून सैन्याकडे धावला आणि त्याने आपल्या भावांस सलाम केला.
David je pustil svoj voz v roki čuvaja voza, stekel v vojsko, prišel in pozdravil svoje brate.
23 २३ तो त्यांच्याशी बोलत असता पाहा तो युद्धवीर पलिष्टी गल्याथ नावाचा गथकर पलिष्ट्यांच्या सैन्यातून निघून मागे म्हटलेले शब्द बोलू लागला आणि ते दावीदाने ऐकले.
Medtem ko je govoril z njimi, glej, je prišel šampion, Filistejec iz Gata, po imenu Goljat, iz vojske Filistejcev in govoril glede na te iste besede in David jih je slišal.
24 २४ सर्व इस्राएलांचे पुरूष त्या मनुष्यास पाहून पळाले आणि फार भ्याले.
Ko so vsi Izraelovi možje videli moža, so zbežali pred njim in bili so boleče prestrašeni.
25 २५ मग इस्राएलाची माणसे म्हणाली, “हा जो मनुष्य पुढे आला आहे त्यास तुम्ही पाहिले काय? तो खरेच इस्राएलाची निंदा करण्यास आला आहे. आणि जो मनुष्य ह्याला जिवे मारील त्यास राजा फार धन देईल आणि आपली कन्या त्यास देईल आणि त्याच्या बापाचे कुटुंब नामांकित करील.”
Možje iz Izraela so rekli: »Ali ste videli tega moža, ki je prišel gor? Zagotovo je prišel gor, da Izraela izpostavi sramotenju. Zgodilo se bo, da bo moža, ki ga ubije, kralj obogatil z velikimi bogastvi in dal mu bo svojo hčer in osvobodil hišo njegovega očeta v Izraelu.«
26 २६ तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?”
David je spregovoril možem, ki so stali poleg njega, rekoč: »Kaj bo storjeno možu, ki ubije tega Filistejca in odvzame grajo od Izraela? Kajti kdo je ta neobrezani Filistejec, da bi izpostavljal sramotenju vojske živega Boga?«
27 २७ मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल.
Ljudstvo mu je odgovorilo na ta način, rekoč: »Tako bo storjeno možu, ki ga ubije.«
28 २८ त्याचा भाऊ अलीयाब याने त्यास या लोकांशी बोलताना ऐकले; तेव्हा अलीयाब दावीदावर रागावून म्हणाला, “तू इकडे का आला आहेस? तू तो कळप रानात कोणाच्या जवळ ठेवला? तुझा गर्व आणि तुझ्या अंतःकरणाची दुष्टाई मी जाणत आहे लढाई पाहावी म्हणून तू आला आहेस.
Njegov najstarejši brat Eliáb pa je slišal, ko je govoril možem. Eliábova jeza je bila vžgana zoper Davida in rekel je: »Zakaj si prišel sèm dol? In s kom si pustil tistih nekaj ovc v divjini? Poznam tvojo ošabnost in porednost tvojega srca, kajti prišel si dol, da bi lahko videl bitko.«
29 २९ तेव्हा दावीद म्हणाला मी आता काय केले आहे? मी फक्त एक शब्द बोललो नाही काय?”
David je rekel: »Kaj sem torej storil? Mar ni tam razlog?«
30 ३० मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले.
Od njega se je obrnil k drugemu in mu govoril na isti način, ljudstvo pa mu je ponovno odgovorilo po prejšnjem načinu.
31 ३१ जे शब्द दावीद बोलला ते लोकांनी ऐकले असता शौलाला सांगितले, मग त्याने त्यास बोलाविले.
Ko so bile slišane besede, ki jih je govoril David, so jih ponovili pred Savlom. In ta je poslal ponj.
32 ३२ तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.”
David je rekel Savlu: »Naj srce nobenega človeka ne upade zaradi njega. Tvoj služabnik bo šel in se boril s tem Filistejcem.«
33 ३३ तेव्हा शौलाने दावीदाला म्हटले, “त्या पलिष्ट्याबरोबर जाऊन लढाई करावयास तू शक्तीमान नाहीस. कारण तू केवळ कोवळा तरुण आहेस. तो तर त्याच्या तरुणपणापासून लढाईचा पुरुष आहे.”
Savel je rekel Davidu: »Ti nisi zmožen iti zoper tega Filistejca, da se boriš z njim, kajti ti si še mladostnik, on pa je bojevnik od svoje mladosti.«
34 ३४ मग दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले.
David je rekel Savlu: »Tvoj služabnik je pasel ovce svojega očeta in prišel je lev in medved in vzel jagnje iz tropa.
35 ३५ मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबडयातून काढले आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले.
Odšel sem ven za njim, ga udaril in to osvobodil iz njegovih ust. Ko se je dvignil zoper mene, sem ga ujel za njegovo grivo, ga udaril in usmrtil.
36 ३६ तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”
Tvoj služabnik je usmrtil tako leva kakor medveda in ta neobrezani Filistejec bo kakor eden izmed njiju, glede na to, da je izzival vojske živega Boga.«
37 ३७ आणखी दावीदाने म्हटले, “ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पलिष्ट्याच्या हातातून मला राखील.” मग शौलाने म्हटले, “जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो.”
Poleg tega je David rekel: » Gospod, ki me je osvobodil iz levje šape in iz medvedje šape, on me bo osvobodil iz roke tega Filistejca.« In Savel je rekel Davidu: »Pojdi in Gospod bodi s teboj.«
38 ३८ तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले.
Savel je Davida oborožil s svojo bojno opremo in mu na glavo nadel bronasto čelado. Prav tako ga je oborožil z verižnim plaščem.
39 ३९ दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “याच्याने मला चालवत नाही. कारण त्यास त्याची सवय नव्हती.” मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली.
David je opasal svoj meč na svojo bojno opremo in poskušal oditi, kajti tega ni preizkusil. David je rekel Savlu: »Ne morem iti s tem, kajti teh [stvari] nisem preizkusil.« In David jih je odložil iz sebe.
40 ४० त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
Vzel je svojo palico v svojo roko in si izbral pet gladkih kamnov iz potoka in jih položil v pastirsko torbo, ki jo je imel, celo v malho in njegova prača je bila v njegovi roki in približal se je Filistejcu.
41 ४१ तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला.
Filistejec je prišel in se približal Davidu in mož, ki je nosil ščit, je šel pred njim.
42 ४२ त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता.
Ko je Filistejec pogledal naokoli in zagledal Davida, ga je preziral, kajti bil je šele mladostnik, rdečkast in lepega obličja.
43 ४३ तेव्हा तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे? म्हणून काठी घेऊन माझ्याकडे आलास?” त्या पलीष्ट्याने दावीदाला आपल्या परमेश्वराच्या नावाने शाप दिला.
Filistejec je Davidu rekel: » Sem mar pes, da prihajaš k meni s palicami?« Filistejec je Davida preklel pri svojih bogovih.
44 ४४ त्या पलिष्टयाने दावीदाला म्हटले, “माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझे शरीर आकाशातील पाखरांना आणि रानातील वनपशूंना देतो.”
Filistejec je rekel Davidu: »Pridi k meni in tvoje meso bom izročil perjadi neba in živalim polja.«
45 ४५ दावीदाने पलिष्ट्याला म्हटले, “तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या सैन्यांचा परमेश्वर ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझवर येत आहे.
Potem je David rekel Filistejcu: »Ti prihajaš k meni z mečem, s sulico in s ščitom, toda jaz prihajam k tebi v imenu Gospoda nad bojevniki, Boga Izraelovih vojsk, ki si ga izpostavljal sramotenju.
46 ४६ परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे.
Ta dan te bo Gospod izročil v mojo roko in udaril te bom in tvojo glavo vzel iz tebe in trupla vojske Filistejcev bom ta dan izročil zračni perjadi in divjim zverem zemlje, da bo vsa zemlja lahko vedela, da je Bog v Izraelu.
47 ४७ हा सर्व समुदाय जाणेल की, तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही. कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल.”
Ves ta zbor bo vedel, da Gospod ne rešuje z mečem in sulico, kajti boj je Gospodov in on vas bo izročil v naše roke.«
48 ४८ मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला.
Pripetilo se je, ko je Filistejec vstal in prišel ter se približal, da sreča Davida, da je David pohitel in stekel proti vojski, da sreča Filistejca.
49 ४९ दावीदाने आपला हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोफणीने मारिला, आणि तो दगड त्या पलिष्ट्याच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पालथा पडला.
David je svojo roko položil v svojo torbo, od tam vzel kamen, ga zalučal in udaril Filistejca v njegovo čelo, da je kamen potonil v njegovo čelo in ta je padel na svoj obraz k zemlji.
50 ५० असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती.
Tako je David prevladal nad Filistejcem s pračo in s kamnom in Filistejca udaril in ubil, pa vendar v Davidovi roki ni bilo meča.
51 ५१ तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले.
Zato je David stekel in obstal nad Filistejcem, vzel njegov meč, ga izvlekel iz njegove nožnice, ga ubil in z njim odsekal njegovo glavo. Ko so Filistejci videli, da je bil njihov šampion mrtev, so pobegnili.
52 ५२ तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले.
Možje iz Izraela in možje iz Juda so vstali, zavpili in zasledovali Filistejce, dokler ne prideš do doline in k velikim vratom Ekróna. Ranjeni izmed Filistejcev so padali dol po poti k Šaarájimu, celo do Gata in do Ekróna.
53 ५३ मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.
Izraelovi otroci so se vrnili iz preganjanja za Filistejci in oplenili njihove šotore.
54 ५४ दावीदाने त्या पलिष्ट्याचे डोके घेऊन यरूशलेमेत आणले, पण त्याची शस्त्रे आपल्या तबूंत ठेवली.
David je vzel glavo Filistejca in jo prinesel v Jeruzalem, toda njegovo bojno opremo je odložil v svoj šotor.
55 ५५ शौलाने दावीदाला त्या पलिष्ट्यांस लढण्यास जाताना पाहिले तेव्हा त्याने अबनेर सेनापती ह्याला म्हटले, “हे अबनेरा तो तरुण कोणाचा पुत्र आहे?” मग अबनेराने म्हटले, “हे राजा तुझ्या जिवाची शपथ मला माहीती नाही.”
Ko je Savel zagledal Davida iti naprej zoper Filistejca, je rekel Abnêrju, poveljniku vojske: »Abnêr, čigav sin je ta mladostnik?« Abnêr je rekel: » Kakor živi tvoja duša, oh kralj, ne morem povedati.«
56 ५६ तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?”
Kralj je rekel: »Poizvedi, čigav sin je ta najstnik.«
57 ५७ त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते.
Ko se je David vrnil iz uboja Filistejca, ga je Abnêr vzel in privedel pred Savla, s Filistejčevo glavo v svoji roki.
58 ५८ तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”
Savel mu je rekel: »Čigav sin si ti, ti mladenič?« David je odgovoril: »Jaz sem sin tvojega služabnika Betlehemca Jeseja.«

< 1 शमुवेल 17 >