< 1 इतिहास 20 >

1 आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरूशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.
וַיְהִ֡י לְעֵת֩ תְּשׁוּבַ֨ת הַשָּׁנָ֜ה לְעֵ֣ת ׀ צֵ֣את הַמְּלָכִ֗ים וַיִּנְהַ֣ג יוֹאָב֩ אֶת־חֵ֨יל הַצָּבָ֜א וַיַּשְׁחֵ֣ת ׀ אֶת־אֶ֣רֶץ בְּנֵֽי־עַמּ֗וֹן וַיָּבֹא֙ וַיָּ֣צַר אֶת־רַבָּ֔ה וְדָוִ֖יד יֹשֵׁ֣ב בִּירֽוּשָׁלִָ֑ם וַיַּ֥ךְ יוֹאָ֛ב אֶת־רַבָּ֖ה וַיֶּֽהֶרְסֶֽהָ׃
2 दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक किक्कार होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्या प्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.
וַיִּקַּ֣ח דָּוִ֣יד אֶת־עֲטֶֽרֶת־מַלְכָּם֩ מֵעַ֨ל רֹאשׁ֜וֹ וַֽיִּמְצָאָ֣הּ ׀ מִשְׁקַ֣ל כִּכַּר־זָהָ֗ב וּבָהּ֙ אֶ֣בֶן יְקָרָ֔ה וַתְּהִ֖י עַל־רֹ֣אשׁ דָּוִ֑יד וּשְׁלַ֥ל הָעִ֛יר הוֹצִ֖יא הַרְבֵּ֥ה מְאֹֽד׃
3 त्या नगरातील लोकांस बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरूशलेमेला परतले.
וְאֶת־הָעָ֨ם אֲשֶׁר־בָּ֜הּ הוֹצִ֗יא וַיָּ֨שַׂר בַּמְּגֵרָ֜ה וּבַחֲרִיצֵ֤י הַבַּרְזֶל֙ וּבַמְּגֵר֔וֹת וְכֵן֙ יַעֲשֶׂ֣ה דָוִ֔יד לְכֹ֖ל עָרֵ֣י בְנֵי־עַמּ֑וֹן וַיָּ֧שָׁב דָּוִ֛יד וְכָל־הָעָ֖ם יְרוּשָׁלִָֽם׃ פ
4 यानंतर असे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टी लोक त्यांना शरण आले.
וַיְהִי֙ אַחֲרֵיכֵ֔ן וַתַּעֲמֹ֧ד מִלְחָמָ֛ה בְּגֶ֖זֶר עִם־פְּלִשְׁתִּ֑ים אָ֣ז הִכָּ֞ה סִבְּכַ֣י הַחֻֽשָׁתִ֗י אֶת־סִפַּ֛י מִילִדֵ֥י הָרְפָאִ֖ים וַיִּכָּנֵֽעוּ׃
5 पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईराचा पुत्र एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.
וַתְּהִי־ע֥וֹד מִלְחָמָ֖ה אֶת־פְּלִשְׁתִּ֑ים וַיַּ֞ךְ אֶלְחָנָ֣ן בֶּן־יעור אֶת־לַחְמִי֙ אֲחִי֙ גָּלְיָ֣ת הַגִּתִּ֔י וְעֵ֣ץ חֲנִית֔וֹ כִּמְנ֖וֹר אֹרְגִֽים׃
6 गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच मनुष्य होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोही रेफाईच्या वंशातला होता.
וַתְּהִי־ע֥וֹד מִלְחָמָ֖ה בְּגַ֑ת וַיְהִ֣י ׀ אִ֣ישׁ מִדָּ֗ה וְאֶצְבְּעֹתָ֤יו שֵׁשׁ־וָשֵׁשׁ֙ עֶשְׂרִ֣ים וְאַרְבַּ֔ע וְגַם־ה֖וּא נוֹלַ֥ד לְהָרָפָֽא׃
7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले.
וַיְחָרֵ֖ף אֶת־יִשְׂרָאֵ֑ל וַיַּכֵּ֙הוּ֙ יְה֣וֹנָתָ֔ן בֶּן־שִׁמְעָ֖א אֲחִ֥י דָוִֽיד׃
8 ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.
אֵ֛ל נוּלְּד֥וּ לְהָרָפָ֖א בְּגַ֑ת וַיִּפְּל֥וּ בְיַד־דָּוִ֖יד וּבְיַד־עֲבָדָֽיו׃ פ

< 1 इतिहास 20 >