< Joshua 23 >

1 Tukun pacl loeloes, LEUM GOD El sang misla nu sin mwet Israel liki mwet lokoalok lalos. In pacl sac, Joshua el arulana matuoh.
परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता.
2 Na el pangoneni mwet Israel nukewa, mwet matu, mwet kol, mwet nununku, mwet leum lalos, ac fahk nu selos, “Nga arulana matuoh inge, ac pacl luk apkuranme.
तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, “मी फार वृद्ध झालो आहे.
3 Kowos liye tari ma nukewa ma LEUM GOD lowos El oru nu sin mutunfacl inge nukewa keiwos. LEUM GOD lowos El mweun keiwos.
तुमच्यासाठी, या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्वकाही कसे केले, हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव, जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला.
4 Liye, nga kitalik tari nu sin sruf lun Israel mutunfacl nukewa su nga sruokya ke mweun oayapa mutunfacl su soenna sruhu, mutawauk Infacl Jordan su oan kutulap, fahla nwe Meoa Mediterranean, su oan roto.
पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे.
5 LEUM GOD lowos El ac fah oru tuh elos in kaingkin kowos, ac El fah luselosyak liki ye motowos. Kowos ac fah eis facl selos, oana LEUM GOD lowos El tuh wulela nu suwos.
आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांना तुमच्यापुढून वतनातून काढीलच, आणि जसे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितले, तसे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.
6 Ke ma inge, kowos in arulana karinganang ac akos ma nukewa ma simla in book in Ma Sap lal Moses, ac nik kowos kuhfla liki.
तेव्हा चांगले बळकट व्हा, यास्तव मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिलेले आहे त्या सर्वांचे पालन करा आणि त्यांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
7 Kowos fah tia asruoki yurin mwetsac su lula in masrlowos, ku fahk inen god lalos, ku fulahk ke inen god lalos, ku epasr nu selos.
तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.
8 A kowos in arulana oaru nu sin LEUM GOD, oana ke kowos oru oemeet me nwe misenge.
परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला बिलगून राहा.
9 Tuh LEUM GOD El lusla mutunfacl yohk ac ku ye motowos, ac wangin sie selos tuh ku in tu lain kowos.
कारण, परमेश्वराने तुमच्यापुढून मोठी व पराक्रमी राष्ट्रे वतनातून घालवली, परंतु तुमची अशी गोष्ट आहे की तुमच्यापुढे आजपर्यंत कोणीही मनुष्य उभा राहू शकला नाही.
10 Siefanna suwos ku in ukwauk sie tausin selos, ke sripen LEUM GOD lowos El mweun keiwos, oana El tuh wulela nu suwos.
१०तुमच्यातला एक मनुष्य हजारांची पाठ पुरवील, कारण की तुमचा देव परमेश्वर याने जसे तुम्हाला सांगितले, तसा तो स्वत: तुमच्यासाठी लढतो.
11 Ke ma inge kowos in sismouk keiwos sifacna tuh kowos in lungse LEUM GOD lowos.
११तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या.
12 Kowos fin soaru ac kupasr nu sin mutunfacl su muta inmasrlowos an, ac payuk nu selos,
१२पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे मागे वळाल, आणि जी तुमच्याजवळ उरलेली राष्ट्रे यांच्याशी चिकटून रहाल आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्यामध्ये जाल, आणि ते तुमच्यामध्ये येतील;
13 kowos in kalem kac lah LEUM GOD lowos El ac fah tia lusak mutunfacl inge liki kowos in oana ke El oru nu suwos meet. A elos ac fah mwe sensen nu suwos oana mwe kwasrip ku luf, na ac fah ngal oana mwe sringsring nu fintukuwos ku otoh nu in motowos. Ma inge ac orek nu suwos nwe ke na wangin sie suwos lula fin acn wowo se ma LEUM GOD lowos El sot nu suwos.
१३तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली, तिच्यावरून तुम्ही नाश पावून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.
14 “Inge nga akola in misa. Kais sie suwos sifacna etu insiowos ac in ngunuwos lah LEUM GOD lowos El sot ma wolana nukewa El tuh wulela kac. Wulela lal nukewa akpwayeyuk; wangin sie tafongla.
१४तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही.
15 Tusruktu, in oana ke LEUM GOD lowos El akpwayeye ma wo nukewa El tuh wulela kac nu suwos, El ac fah usot pac nu fowos ma koluk nukewa nwe ke na El unikowosla liki facl wolana se su LEUM GOD lowos El sot nu suwos.
१५तर असे होईल की तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जशी तुम्हाला प्राप्त झाली तशी देव तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी अशी करील; जी ही उत्तम भूमी तुमच्या देवाने तुम्हाला दिली आहे, तिच्यावरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोपर्यंत तो असे करील.
16 Kowos fin tia karinganang wulela se ma LEUM GOD lowos El sapkin nu suwos, ac kowos fin kulansap ac alu nu sin god saya, na mulat lun God ac fah tayak lain kowos, na ac tia paht, ac fah wangin sie suwos lula ke facl wolana se inge su El asot nu suwos.”
१६तुमचा देव परमेश्वर याने जो करार पाळण्याची तुम्हाला आज्ञा केली आहे, तो मोडून दुसऱ्या देवाची सेवा कराल, आणि त्यांना नमन कराल, तर देवाचा राग तुम्हावर भडकेल, आणि जो उत्तम देश त्याने तुम्हाला दिला आहे, त्यातून तुम्हाला त्वरीत नष्ट करील.”

< Joshua 23 >