< Salmi 150 >

1 ALLELUIA. Lodate Iddio nel suo santuario; Lodatelo nella distesa della sua gloria.
परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
2 Lodatelo per le sue prodezze; Lodatelo secondo la sua somma grandezza.
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
3 Lodatelo col suon della tromba; Lodatelo col saltero e [col]la cetera.
शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
4 Lodatelo col tamburo e [col] flauto; Lodatelo coll'arpicordo e [col]l'organo.
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
5 Lodatelo con cembali sonanti; Lodatelo con cembali squillanti.
जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
6 Ogni [cosa che ha] fiato lodi il Signore. Alleluia.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.

< Salmi 150 >