< Lukács 14 >

1 Történt, amikor bement a farizeusok egyik vezetőjének házába szombaton ebédelni, azok figyelték őt.
एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते.
2 És íme, egy vízkóros ember volt előtte.
आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता.
3 Ekkor Jézus megszólalt, és megkérdezte a törvénytudóktól és farizeusoktól: „Szabad-e szombatnapon gyógyítani?“
येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?”
4 Azok pedig hallgattak. Erre megfogta azt, meggyógyította és elbocsátotta.
परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.
5 Nekik pedig ezt mondta: „Ki az közületek, akinek szamara vagy ökre szombatnapon kútba esik, és nem húzza ki azt azonnal?“
मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?”
6 De azok nem tudtak erre mit felelni.
आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.
7 Egy példázatot is mondott a meghívottaknak, amikor észrevette, hogyan válogatják a főhelyeket. Ezt mondta nekik:
नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला,
8 „Amikor valaki lakodalomba hív, ne ülj a főhelyre, mert talán nálad nagyobb tiszteletben álló embert is meghívott.
“जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
9 És odamegy az, aki mind téged, mind azt meghívta, ezt mondja majd neked: Engedd át ennek a helyet! És akkor szégyenkezve az utolsó helyre fogsz ülni.
मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल.
10 Hanem ha meghívnak, menj el, és ülj le az utolsó helyre, hogy amikor odamegy, aki téged meghívott, ezt mondja neked: Barátom, ülj feljebb! Akkor becsületed lesz azok előtt, akik veled együtt ülnek.
१०पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल.
11 Mert mindenki, aki magát felmagasztalja, megaláztatik, aki pedig megalázza magát, felmagasztaltatik.“
११कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
12 Szólt akkor annak is, aki őt meghívta: „Amikor ebédet vagy vacsorát készítesz, ne barátaidat, testvéreidet, rokonaidat, gazdag szomszédaidat hívd meg, hogy majd azok is viszonzásul meghívjanak téged.
१२मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल.
13 Hanem amikor lakomát készítesz, hívd meg a szegényeket, csonkabonkákat, sántákat, vakokat,
१३पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
14 és boldog leszel, mert azok nem tudják viszonozni, de majd viszonozzák neked az igazak feltámadásakor.“
१४म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
15 Amikor ezeket meghallotta valaki, aki vele együtt ült, ezt mondta neki: „Boldog az, aki kenyeret eszik Isten országában.“
१५मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.”
16 Ő pedig ezt mondta annak: „Egy ember nagy vacsorát készített, és sokakat meghívott.
१६मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले.
17 És elküldte szolgáját a vacsora idején, hogy mondja meg a meghívottaknak: Jöjjetek, mert már minden kész!
१७भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले.
18 És mindnyájan egyformán kezdték magukat kimenteni. Az első ezt mondta neki: Szántóföldet vettem, és ki kell mennem, hogy megnézzem, kérlek téged, ments ki engem!
१८ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’
19 A másik ezt mondta: Öt iga ökröt vettem, és elmegyek, hogy azokat kipróbáljam, kérlek téged, ments ki engem!
१९दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’
20 Megint egy másik ezt mondta: Most nősültem, és azért nem mehetek.
२०आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
21 Amikor a szolga hazament, megmondta ezeket az ő urának. Akkor megharagudott a gazda, és ezt mondta szolgájának: Eredj hamar a város utjaira, és utcáira és hozd be ide a szegényeket, csonkabonkákat, sántákat és vakokat.
२१तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
22 És szólt a szolga: Uram, meglett, amint parancsoltad, és mégis van hely.
२२नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’
23 Akkor ezt mondta az úr a szolgának: Eredj el az utakra és a kerítésekhez, és kényszeríts bejönni mindenkit, hogy megteljék az én házam.
२३मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.
24 Mert mondom nektek, hogy azok közül, akiket meghívtam, senki sem kóstolja meg a vacsorámat.“
२४कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”
25 Nagy sokaság ment vele, és amikor megfordult, ezt mondta nekik:
२५मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला,
26 „Ha valaki hozzám jön, és meg nem gyűlöli az atyját és anyját, feleségét és gyermekeit, fitestvérét és nőtestvérét, sőt még a maga lelkét is, nem lehet az én tanítványom.
२६“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
27 És aki nem hordozza keresztjét, és nem jön utánam, nem lehet az én tanítványom.
२७जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
28 „Mert ki az közületek, aki tornyot akar építeni, és először nem ül le, hogy kiszámítsa a költségeket, hogy van-e, amiből befejezze?
२८जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
29 Nehogy, miután fundamentumot vetett, és nem tudja befejezni, csúfolni kezdje őt mindenki, aki csak látja.
२९नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील,
30 És ezt mondják: Ez az ember elkezdte az építkezést, de nem tudta befejezni!
३०या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही!
31 Vagy ha egy király, amikor háborúba megy, hogy egy másik királlyal harcba szálljon, nem ül-e le először tanácskozni, hogy tízezerrel szembeszállhat-e azzal, aki húszezerrel jön ellene?
३१किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय?
32 Mert különben, amikor az még távol van, követséget küld, és megkérdezi a békefeltételeket.
३२जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील.
33 Így tehát, ha valaki búcsút nem vesz minden vagyonától, nem lehet az én tanítványom.
३३त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
34 Jó a só, de ha a só ízét veszti, mivel sózzák meg?
३४मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल?
35 Sem a földre, sem a trágyára nem alkalmas, tehát kidobják. Akinek van füle a hallásra, hallja!“
३५ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

< Lukács 14 >