< תְהִלִּים 79 >

מִזְמ֗וֹר לְאָ֫סָ֥ף אֱֽלֹהִ֡ים בָּ֤אוּ גוֹיִ֨ם ׀ בְּֽנַחֲלָתֶ֗ךָ טִ֭מְּאוּ אֶת־הֵיכַ֣ל קָדְשֶׁ֑ךָ שָׂ֖מוּ אֶת־יְרוּשָׁלִַ֣ם לְעִיִּֽים׃ 1
आसाफाचे स्तोत्र हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरूशलेमेचे ढिगारे केले आहेत.
נָֽתְנ֡וּ אֶת־נִבְלַ֬ת עֲבָדֶ֗יךָ מַ֭אֲכָל לְע֣וֹף הַשָּׁמָ֑יִם בְּשַׂ֥ר חֲ֝סִידֶ֗יךָ לְחַיְתוֹ־אָֽרֶץ׃ 2
त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.
שָׁפְכ֬וּ דָמָ֨ם ׀ כַּמַּ֗יִם סְֽבִ֘יב֤וֹת יְֽרוּשָׁלִָ֗ם וְאֵ֣ין קוֹבֵֽר׃ 3
त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.
הָיִ֣ינוּ חֶ֭רְפָּה לִשְׁכֵנֵ֑ינוּ לַ֥עַג וָ֝קֶ֗לֶס לִסְבִיבוֹתֵֽינוּ׃ 4
आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
עַד־מָ֣ה יְ֭הוָה תֶּאֱנַ֣ף לָנֶ֑צַח תִּבְעַ֥ר כְּמוֹ־אֵ֝֗שׁ קִנְאָתֶֽךָ׃ 5
हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का? तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील?
שְׁפֹ֤ךְ חֲמָתְךָ֨ אֶֽל־הַגּוֹיִם֮ אֲשֶׁ֪ר לֹא־יְדָ֫ע֥וּךָ וְעַ֥ל מַמְלָכ֑וֹת אֲשֶׁ֥ר בְּ֝שִׁמְךָ֗ לֹ֣א קָרָֽאוּ׃ 6
जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत.
כִּ֭י אָכַ֣ל אֶֽת־יַעֲקֹ֑ב וְֽאֶת־נָוֵ֥הוּ הֵשַֽׁמּוּ׃ 7
कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे, आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
אַֽל־תִּזְכָּר־לָנוּ֮ עֲוֺנֹ֪ת רִאשֹׁ֫נִ֥ים מַ֭הֵר יְקַדְּמ֣וּנוּ רַחֲמֶ֑יךָ כִּ֖י דַלּ֣וֹנוּ מְאֹֽד׃ 8
आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
עָזְרֵ֤נוּ ׀ אֱלֹ֘הֵ֤י יִשְׁעֵ֗נוּ עַל־דְּבַ֥ר כְּבֽוֹד־שְׁמֶ֑ךָ וְהַצִּילֵ֥נוּ וְכַפֵּ֥ר עַל־חַ֝טֹּאתֵ֗ינוּ לְמַ֣עַן שְׁמֶֽךָ׃ 9
हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
לָ֤מָּה ׀ יֹאמְר֣וּ הַגּוֹיִם֮ אַיֵּ֪ה אֱֽלֹהֵ֫יהֶ֥ם יִוָּדַ֣ע בגיים לְעֵינֵ֑ינוּ נִ֝קְמַ֗ת דַּֽם־עֲבָדֶ֥יךָ הַשָּׁפֽוּךְ׃ 10
१०ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले, त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.
תָּ֤ב֣וֹא לְפָנֶיךָ֮ אֶנְקַ֪ת אָ֫סִ֥יר כְּגֹ֥דֶל זְרוֹעֲךָ֑ ה֝וֹתֵ֗ר בְּנֵ֣י תְמוּתָֽה׃ 11
११कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे; ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.
וְהָ֘שֵׁ֤ב לִשְׁכֵנֵ֣ינוּ שִׁ֭בְעָתַיִם אֶל־חֵיקָ֑ם חֶרְפָּ֘תָ֤ם אֲשֶׁ֖ר חֵרְפ֣וּךָ אֲדֹנָֽי׃ 12
१२हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल.
וַאֲנַ֤חְנוּ עַמְּךָ֨ ׀ וְצֹ֥אן מַרְעִיתֶךָ֮ נ֤וֹדֶ֥ה לְּךָ֗ לְע֫וֹלָ֥ם לְדֹ֥ר וָדֹ֑ר נְ֝סַפֵּ֗ר תְּהִלָּתֶֽךָ׃ 13
१३मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.

< תְהִלִּים 79 >