< נַחוּם 3 >

ה֖וֹי עִ֣יר דָּמִ֑ים כֻּלָּ֗הּ כַּ֤חַשׁ פֶּ֙רֶק֙ מְלֵאָ֔ה לֹ֥א יָמִ֖ישׁ טָֽרֶף׃ 1
पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो! ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे; तिच्यात नेहमी बळी आहेत.
ק֣וֹל שׁ֔וֹט וְק֖וֹל רַ֣עַשׁ אוֹפָ֑ן וְס֣וּס דֹּהֵ֔ר וּמֶרְכָּבָ֖ה מְרַקֵּדָֽה׃ 2
परंतु आता तेथे चाबकांच्या फटकाऱ्यांचे आवाज, चाकांच्या खडखडाटाचे ध्वनी, घोड्यांच्या टापांचे आणि रथाच्या घडघडाटाचे आवाज तुम्ही ऐकता.
פָּרָ֣שׁ מַעֲלֶ֗ה וְלַ֤הַב חֶ֙רֶב֙ וּבְרַ֣ק חֲנִ֔ית וְרֹ֥ב חָלָ֖ל וְכֹ֣בֶד פָּ֑גֶר וְאֵ֥ין קֵ֙צֶה֙ לַגְּוִיָּ֔ה יכשלו בִּגְוִיָּתָֽם׃ 3
लढाई करणाऱ्या घोडेस्वाराचे दृष्य, तलवारीचे चकाकणे, भाल्याची चमक, प्रेतांचा ढीग आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही; त्याचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत.
מֵרֹב֙ זְנוּנֵ֣י זוֹנָ֔ה ט֥וֹבַת חֵ֖ן בַּעֲלַ֣ת כְּשָׁפִ֑ים הַמֹּכֶ֤רֶת גּוֹיִם֙ בִּזְנוּנֶ֔יהָ וּמִשְׁפָּח֖וֹת בִּכְשָׁפֶֽיהָ׃ 4
हे सर्व सुंदर वेश्येच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे, जी निपुण चेटकी आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीण कृतीने लोकांस विकते.
הִנְנִ֣י אֵלַ֗יִךְ נְאֻם֙ יְהוָ֣ה צְבָא֔וֹת וְגִלֵּיתִ֥י שׁוּלַ֖יִךְ עַל־פָּנָ֑יִךְ וְהַרְאֵיתִ֤י גוֹיִם֙ מַעְרֵ֔ךְ וּמַמְלָכ֖וֹת קְלוֹנֵֽךְ׃ 5
पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडापर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन.
וְהִשְׁלַכְתִּ֥י עָלַ֛יִךְ שִׁקֻּצִ֖ים וְנִבַּלְתִּ֑יךְ וְשַׂמְתִּ֖יךְ כְּרֹֽאִי׃ 6
मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजिरवाणे करीन. प्रत्येकजण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन.
וְהָיָ֤ה כָל־רֹאַ֙יִךְ֙ יִדּ֣וֹד מִמֵּ֔ךְ וְאָמַר֙ שָׁדְּדָ֣ה נִֽינְוֵ֔ה מִ֖י יָנ֣וּד לָ֑הּ מֵאַ֛יִן אֲבַקֵּ֥שׁ מְנַחֲמִ֖ים לָֽךְ׃ 7
असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू?
הֲתֵֽיטְבִי֙ מִנֹּ֣א אָמ֔וֹן הַיֹּֽשְׁבָה֙ בַּיְאֹרִ֔ים מַ֖יִם סָבִ֣יב לָ֑הּ אֲשֶׁר־חֵ֣יל יָ֔ם מִיָּ֖ם חוֹמָתָֽהּ׃ 8
निनवे तू थेबेस, जी नील नदीच्यावर बांधली आहे, तिचे सभोवती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय?
כּ֥וּשׁ עָצְמָ֛ה וּמִצְרַ֖יִם וְאֵ֣ין קֵ֑צֶה פּ֣וּט וְלוּבִ֔ים הָי֖וּ בְּעֶזְרָתֵֽךְ׃ 9
कूशी व मिसरी यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते; पूटी व लुबी यांची तिला मदत होती.
גַּם־הִ֗יא לַגֹּלָה֙ הָלְכָ֣ה בַשֶּׁ֔בִי גַּ֧ם עֹלָלֶ֛יהָ יְרֻטְּשׁ֖וּ בְּרֹ֣אשׁ כָּל־חוּצ֑וֹת וְעַל־נִכְבַּדֶּ֙יהָ֙ יַדּ֣וּ גוֹרָ֔ל וְכָל־גְּדוֹלֶ֖יהָ רֻתְּק֥וּ בַזִּקִּֽים׃ 10
१०तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले, ती बंदीवासात गेली तिची तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठीत मनुष्यांवर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान मनुष्यांना साखळ्यांनी बांधून नेले.
גַּם־אַ֣תְּ תִּשְׁכְּרִ֔י תְּהִ֖י נַֽעֲלָמָ֑ה גַּם־אַ֛תְּ תְּבַקְשִׁ֥י מָע֖וֹז מֵאוֹיֵֽב׃ 11
११तू सुध्दा दारूड्या होशील. तू लपण्याचा प्रयत्न करशील. तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील.
כָּ֨ל־מִבְצָרַ֔יִךְ תְּאֵנִ֖ים עִם־בִּכּוּרִ֑ים אִם־יִנּ֕וֹעוּ וְנָפְל֖וּ עַל־פִּ֥י אוֹכֵֽל׃ 12
१२तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होतील. जर ते हालविले, तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
הִנֵּ֨ה עַמֵּ֤ךְ נָשִׁים֙ בְּקִרְבֵּ֔ךְ לְאֹ֣יְבַ֔יִךְ פָּת֥וֹחַ נִפְתְּח֖וּ שַׁעֲרֵ֣י אַרְצֵ֑ךְ אָכְלָ֥ה אֵ֖שׁ בְּרִיחָֽיִך׃ 13
१३पाहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियांप्रमाणे आहेत. तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आग्नीने खाऊन टाकले आहेत.
מֵ֤י מָצוֹר֙ שַֽׁאֲבִי־לָ֔ךְ חַזְּקִ֖י מִבְצָרָ֑יִךְ בֹּ֧אִי בַטִּ֛יט וְרִמְסִ֥י בַחֹ֖מֶר הַחֲזִ֥יקִי מַלְבֵּֽן׃ 14
१४वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ; तुझे किल्ले मजबूत कर; चिखलात उतर आणि पायांनी चुना तुडव; विटांची भिंत दुरूस्त कर.
שָׁ֚ם תֹּאכְלֵ֣ךְ אֵ֔שׁ תַּכְרִיתֵ֣ךְ חֶ֔רֶב תֹּאכְלֵ֖ךְ כַּיָּ֑לֶק הִתְכַּבֵּ֣ד כַּיֶּ֔לֶק הִֽתְכַּבְּדִ֖י כָּאַרְבֶּֽה׃ 15
१५तुला आग खाऊन टाकील, आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुडींनी येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो.
הִרְבֵּית֙ רֹֽכְלַ֔יִךְ מִכּוֹכְבֵ֖י הַשָּׁמָ֑יִם יֶ֥לֶק פָּשַׁ֖ט וַיָּעֹֽף׃ 16
१६आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत. परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत; ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील.
מִנְּזָרַ֙יִךְ֙ כָּֽאַרְבֶּ֔ה וְטַפְסְרַ֖יִךְ כְּג֣וֹב גֹּבָ֑י הַֽחוֹנִ֤ים בַּגְּדֵרוֹת֙ בְּי֣וֹם קָרָ֔ה שֶׁ֤מֶשׁ זָֽרְחָה֙ וְנוֹדַ֔ד וְלֹֽא־נוֹדַ֥ע מְקוֹמ֖וֹ אַיָּֽם׃ 17
१७तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळांसारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळ्याच्या झुंडीप्रमाणे आहेत; ते थंडीच्या दिवसात कुंपणांमध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कोठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही.
נָמ֤וּ רֹעֶ֙יךָ֙ מֶ֣לֶךְ אַשּׁ֔וּר יִשְׁכְּנ֖וּ אַדִּירֶ֑יךָ נָפֹ֧שׁוּ עַמְּךָ֛ עַל־הֶהָרִ֖ים וְאֵ֥ין מְקַבֵּֽץ׃ 18
१८अश्शूराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत. तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत. तुझे लोक पर्वतांवर पांगले आहेत. आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही.
אֵין־כֵּהָ֣ה לְשִׁבְרֶ֔ךָ נַחְלָ֖ה מַכָּתֶ֑ךָ כֹּ֣ל ׀ שֹׁמְעֵ֣י שִׁמְעֲךָ֗ תָּ֤קְעוּ כַף֙ עָלֶ֔יךָ כִּ֗י עַל־מִ֛י לֹֽא־עָבְרָ֥ה רָעָתְךָ֖ תָּמִֽיד׃ 19
१९तुझी जखम बरी होणे शक्य नाही. तुझी जखम असाह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येकजण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?

< נַחוּם 3 >