< הוֹשֵׁעַ 6 >

לְכוּ֙ וְנָשׁ֣וּבָה אֶל־יְהוָ֔ה כִּ֛י ה֥וּא טָרָ֖ף וְיִרְפָּאֵ֑נוּ יַ֖ךְ וְיַחְבְּשֵֽׁנוּ׃ 1
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
יְחַיֵּ֖נוּ מִיֹּמָ֑יִם בַּיּוֹם֙ הַשְּׁלִישִׁ֔י יְקִמֵ֖נוּ וְנִחְיֶ֥ה לְפָנָֽיו׃ 2
दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
וְנֵדְעָ֣ה נִרְדְּפָ֗ה לָדַ֙עַת֙ אֶת־יְהוָ֔ה כְּשַׁ֖חַר נָכ֣וֹן מֽוֹצָא֑וֹ וְיָב֤וֹא כַגֶּ֙שֶׁם֙ לָ֔נוּ כְּמַלְק֖וֹשׁ י֥וֹרֶה אָֽרֶץ׃ 3
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
מָ֤ה אֶֽעֱשֶׂה־לְּךָ֙ אֶפְרַ֔יִם מָ֥ה אֶעֱשֶׂה־לְּךָ֖ יְהוּדָ֑ה וְחַסְדְּכֶם֙ כַּֽעֲנַן־בֹּ֔קֶר וְכַטַּ֖ל מַשְׁכִּ֥ים הֹלֵֽךְ׃ 4
एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
עַל־כֵּ֗ן חָצַ֙בְתִּי֙ בַּנְּבִיאִ֔ים הֲרַגְתִּ֖ים בְּאִמְרֵי־פִ֑י וּמִשְׁפָּטֶ֖יךָ א֥וֹר יֵצֵֽא׃ 5
म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
כִּ֛י חֶ֥סֶד חָפַ֖צְתִּי וְלֹא־זָ֑בַח וְדַ֥עַת אֱלֹהִ֖ים מֵעֹלֽוֹת׃ 6
कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
וְהֵ֕מָּה כְּאָדָ֖ם עָבְר֣וּ בְרִ֑ית שָׁ֖ם בָּ֥גְדוּ בִֽי׃ 7
आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
גִּלְעָ֕ד קִרְיַ֖ת פֹּ֣עֲלֵי אָ֑וֶן עֲקֻבָּ֖ה מִדָּֽם׃ 8
गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
וּכְחַכֵּ֨י אִ֜ישׁ גְּדוּדִ֗ים חֶ֚בֶר כֹּֽהֲנִ֔ים דֶּ֖רֶךְ יְרַצְּחוּ־שֶׁ֑כְמָה כִּ֥י זִמָּ֖ה עָשֽׂוּ׃ 9
जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.
בְּבֵית֙ יִשְׂרָאֵ֔ל רָאִ֖יתִי שעריריה שָׁ֚ם זְנ֣וּת לְאֶפְרַ֔יִם נִטְמָ֖א יִשְׂרָאֵֽל׃ 10
१०इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
גַּם־יְהוּדָ֕ה שָׁ֥ת קָצִ֖יר לָ֑ךְ בְּשׁוּבִ֖י שְׁב֥וּת עַמִּֽי׃ פ 11
११तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.

< הוֹשֵׁעַ 6 >