< יְשַׁעְיָהוּ 24 >

הִנֵּ֧ה יְהוָ֛ה בֹּוקֵ֥ק הָאָ֖רֶץ וּבֹֽולְקָ֑הּ וְעִוָּ֣ה פָנֶ֔יהָ וְהֵפִ֖יץ יֹשְׁבֶֽיהָ׃ 1
पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.
וְהָיָ֤ה כָעָם֙ כַּכֹּהֵ֔ן כַּעֶ֙בֶד֙ כַּֽאדֹנָ֔יו כַּשִּׁפְחָ֖ה כַּגְּבִרְתָּ֑הּ כַּקֹּונֶה֙ כַּמֹּוכֵ֔ר כַּמַּלְוֶה֙ כַּלֹּוֶ֔ה כַּנֹּשֶׁ֕ה כַּאֲשֶׁ֖ר נֹשֶׁ֥א בֹֽו׃ 2
आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.
הִבֹּ֧וק ׀ תִּבֹּ֛וק הָאָ֖רֶץ וְהִבֹּ֣וז ׀ תִּבֹּ֑וז כִּ֣י יְהוָ֔ה דִּבֶּ֖ר אֶת־הַדָּבָ֥ר הַזֶּֽה׃ 3
पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
אָבְלָ֤ה נָֽבְלָה֙ הָאָ֔רֶץ אֻמְלְלָ֥ה נָבְלָ֖ה תֵּבֵ֑ל אֻמְלָ֖לוּ מְרֹ֥ום עַם־הָאָֽרֶץ׃ 4
मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.
וְהָאָ֥רֶץ חָנְפָ֖ה תַּ֣חַת יֹשְׁבֶ֑יהָ כִּֽי־עָבְר֤וּ תֹורֹת֙ חָ֣לְפוּ חֹ֔ק הֵפֵ֖רוּ בְּרִ֥ית עֹולָֽם׃ 5
पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.
עַל־כֵּ֗ן אָלָה֙ אָ֣כְלָה אֶ֔רֶץ וַֽיֶּאְשְׁמ֖וּ יֹ֣שְׁבֵי בָ֑הּ עַל־כֵּ֗ן חָרוּ֙ יֹ֣שְׁבֵי אֶ֔רֶץ וְנִשְׁאַ֥ר אֱנֹ֖ושׁ מִזְעָֽר׃ 6
त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.
אָבַ֥ל תִּירֹ֖ושׁ אֻמְלְלָה־גָ֑פֶן נֶאֶנְח֖וּ כָּל־שִׂמְחֵי־לֵֽב׃ 7
नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत.
שָׁבַת֙ מְשֹׂ֣ושׂ תֻּפִּ֔ים חָדַ֖ל שְׁאֹ֣ון עַלִּיזִ֑ים שָׁבַ֖ת מְשֹׂ֥ושׂ כִּנֹּֽור׃ 8
डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत, वीणेचा आनंद बंद केला आहे.
בַּשִּׁ֖יר לֹ֣א יִשְׁתּוּ־יָ֑יִן יֵמַ֥ר שֵׁכָ֖ר לְשֹׁתָֽיו׃ 9
ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.
נִשְׁבְּרָ֖ה קִרְיַת־תֹּ֑הוּ סֻגַּ֥ר כָּל־בַּ֖יִת מִבֹּֽוא׃ 10
१०अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे.
צְוָחָ֥ה עַל־הַיַּ֖יִן בַּֽחוּצֹ֑ות עָֽרְבָה֙ כָּל־שִׂמְחָ֔ה גָּלָ֖ה מְשֹׂ֥ושׂ הָאָֽרֶץ׃ 11
११द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे. सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.
נִשְׁאַ֥ר בָּעִ֖יר שַׁמָּ֑ה וּשְׁאִיָּ֖ה יֻכַּת־שָֽׁעַר׃ 12
१२नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.
כִּ֣י כֹ֥ה יִהְיֶ֛ה בְּקֶ֥רֶב הָאָ֖רֶץ בְּתֹ֣וךְ הָֽעַמִּ֑ים כְּנֹ֣קֶף זַ֔יִת כְּעֹולֵלֹ֖ת אִם־כָּלָ֥ה בָצִֽיר׃ 13
१३द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल.
הֵ֛מָּה יִשְׂא֥וּ קֹולָ֖ם יָרֹ֑נּוּ בִּגְאֹ֣ון יְהוָ֔ה צָהֲל֖וּ מִיָּֽם׃ 14
१४ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील, आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील.
עַל־כֵּ֥ן בָּאֻרִ֖ים כַּבְּד֣וּ יְהוָ֑ה בְּאִיֵּ֣י הַיָּ֔ם שֵׁ֥ם יְהוָ֖ה אֱלֹהֵ֥י יִשְׂרָאֵֽל׃ ס 15
१५यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा, आणि सागरातील द्वीपांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर, याच्या नावाला गौरव द्या.
מִכְּנַ֨ף הָאָ֜רֶץ זְמִרֹ֤ת שָׁמַ֙עְנוּ֙ צְבִ֣י לַצַּדִּ֔יק וָאֹמַ֛ר רָזִי־לִ֥י רָֽזִי־לִ֖י אֹ֣וי לִ֑י בֹּגְדִ֣ים בָּגָ֔דוּ וּבֶ֥גֶד בֹּוגְדִ֖ים בָּגָֽדוּ׃ 16
१६पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.
פַּ֥חַד וָפַ֖חַת וָפָ֑ח עָלֶ֖יךָ יֹושֵׁ֥ב הָאָֽרֶץ׃ 17
१७पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.
וֽ͏ְ֠הָיָה הַנָּ֞ס מִקֹּ֤ול הַפַּ֙חַד֙ יִפֹּ֣ל אֶל־הַפַּ֔חַת וְהָֽעֹולֶה֙ מִתֹּ֣וךְ הַפַּ֔חַת יִלָּכֵ֖ד בַּפָּ֑ח כִּֽי־אֲרֻבֹּ֤ות מִמָּרֹום֙ נִפְתָּ֔חוּ וַֽיִּרְעֲשׁ֖וּ מֹ֥וסְדֵי אָֽרֶץ׃ 18
१८जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल. स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत.
רֹ֥עָה הִֽתְרֹעֲעָ֖ה הָאָ֑רֶץ פֹּ֤ור הִֽתְפֹּורְרָה֙ אֶ֔רֶץ מֹ֥וט הִֽתְמֹוטְטָ֖ה אָֽרֶץ׃ 19
१९पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे. पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे.
נֹ֣ועַ תָּנ֤וּעַ אֶ֙רֶץ֙ כַּשִּׁכֹּ֔ור וְהִֽתְנֹודְדָ֖ה כַּמְּלוּנָ֑ה וְכָבַ֤ד עָלֶ֙יהָ֙ פִּשְׁעָ֔הּ וְנָפְלָ֖ה וְלֹא־תֹסִ֥יף קֽוּם׃ ס 20
२०पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल, तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही.
וְהָיָה֙ בַּיֹּ֣ום הַה֔וּא יִפְקֹ֧ד יְהוָ֛ה עַל־צְבָ֥א הַמָּרֹ֖ום בַּמָּרֹ֑ום וְעַל־מַלְכֵ֥י הָאֲדָמָ֖ה עַל־הָאֲדָמָֽה׃ 21
२१त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.
וְאֻסְּפ֨וּ אֲסֵפָ֤ה אַסִּיר֙ עַל־בֹּ֔ור וְסֻגְּר֖וּ עַל־מַסְגֵּ֑ר וּמֵרֹ֥ב יָמִ֖ים יִפָּקֵֽדוּ׃ 22
२२त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल.
וְחָֽפְרָה֙ הַלְּבָנָ֔ה וּבֹושָׁ֖ה הַֽחַמָּ֑ה כִּֽי־מָלַ֞ךְ יְהוָ֣ה צְבָאֹ֗ות בְּהַ֤ר צִיֹּון֙ וּבִיר֣וּשָׁלַ֔͏ִם וְנֶ֥גֶד זְקֵנָ֖יו כָּבֹֽוד׃ פ 23
२३नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.

< יְשַׁעְיָהוּ 24 >