< Hesekiel 31 >

1 Und es begab sich im elften jahr, am ersten Tage des dritten Monats, geschah des HERRN Wort zu mir und sprach:
बाबेलातील बंदिवासाच्या अकराव्या वर्षी, तिसऱ्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले,
2 Du Menschenkind, sage zu Pharao, dem König von Ägypten, und zu allem seinem Volk: Wem meinst du denn, daß du gleich seist in deiner Herrlichkeit?
“मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो आणि त्याच्यासभोवती असलेले त्याचे सेवक, यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस?
3 Siehe, Assur war wie ein Zedernbaum auf dem Libanon, von schönen Ästen und dick von Laub und sehr hoch, daß sein Wipfel hoch stand unter großen, dichten Zweigen.
पाहा! अश्शूर लबानोनात सुंदर फांद्याचा, व दाट छायेचा व उंच उंचीचा गंधसरू असा होता. आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता.
4 Die Wasser machten, daß er groß ward, und die Tiefe, daß er hoch wuchs. Ihre Ströme gingen rings um seinen Stamm her und ihre Bäche zu allen Bäumen im Felde.
पुष्कळ जलांनी त्यास उंच वाढवले. खोल जलांनी त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या त्यांचे पाट शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते.
5 Darum ist er höher geworden als alle Bäume im Felde und kriegte viel Äste und lange Zweige; denn er hatte Wasser genug, sich auszubreiten.
म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडांपेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्यास भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या.
6 Alle Vögel des Himmels nisteten auf seinen Ästen, und alle Tiere im Felde hatten Junge unter seinen Zweigen; und unter seinem Schatten wohnten alle großen Völker.
आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी करीत. त्याच्या खांद्याच्या खाली सर्व वनपशू पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावली खाली सर्व मोठी राष्ट्रे राहत.
7 Er hatte schöne, große und lange Äste; denn seine Wurzeln hatten viel Wasser.
वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
8 Und war ihm kein Zedernbaum gleich in Gottes Garten, und die Tannenbäume waren seinen Ästen nicht zu vergleichen, und die Kastanienbäume waren nichts gegen seine Zweige. Ja, er war so schön wie kein Baum im Garten Gottes.
देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते.
9 Ich hatte ihn so schön gemacht, daß er so viel Äste kriegte, daß ihn alle lustigen Bäume im Garten Gottes neideten.
मी त्यास खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्यांचा द्वेष करीत.
10 Darum spricht der Herr HERR also: Weil er so hoch geworden ist, daß sein Wipfel stand unter großen, hohen, dichten Zweigen, und sein Herz sich erhob, daß er so hoch geworden war,
१०यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतोः कारण त्याने आपणाला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेंड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे.
11 darum gab ich ihn dem Mächtigen unter den Heiden in die Hände, daß der mit ihm umginge und ihn vertriebe, wie er verdient hat mit seinem gottlosen Wesen,
११म्हणून मी त्यास पकडून एका बलिष्ट राष्ट्राच्या राज्यकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राज्यकर्ता त्याच्याविरुध्द कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्यास दूर काढून टाकीन.
12 daß Fremde ihn ausrotten sollten, nämlich die Tyrannen der Heiden, und ihn zerstreuen, und seine Äste auf den Bergen und in allen Tälern liegen mußten und seine Zweige zerbrachen an allen Bächen im Lande; daß alle Völker auf Erden von seinem Schatten wegziehen mußten und ihn verlassen;
१२सर्व राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्यास तोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे.
13 und alle Vögel des Himmels auf seinem umgefallenen Stamm saßen und alle Tiere im Felde sich legten auf seine Äste;
१३त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशू त्याच्या फांद्यावरती बसतात.
14 auf daß sich forthin kein Baum am Wasser seiner Höhe überhebe, daß sein Wipfel unter großen, dichten Zweigen stehe, und kein Baum am Wasser sich erhebe über die andern; denn sie müssen alle unter die Erde und dem Tod übergeben werden wie andere Menschen, die in die Grube fahren.
१४आता, पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये. कारण सर्व पाणी पिणाऱ्यानी, आपल्या उंचीने उंचावू नये. कारण त्या सर्वास मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवजात जाते तिच्यात त्यासही जावयास लाविले आहे.
15 So spricht der Herr HERR: Zu der Zeit, da er hinunter in die Hölle fuhr, da machte ich ein Trauern, daß ihn die Tiefe bedeckte und seine Ströme stillstehen mußten und die großen Wasser nicht laufen konnten; und machte, daß der Libanon um ihn trauerte und alle Feldbäume verdorrten über ihm. (Sheol h7585)
१५प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. (Sheol h7585)
16 Ich erschreckte die Heiden, da sie ihn hörten fallen, da ich ihn hinunterließ zur Hölle, zu denen, so in die Grube gefahren sind. Und alle lustigen Bäume unter der Erde, die edelsten und besten auf dem Libanon, und alle, die am Wasser gestanden hatten, gönnten's ihm wohl. (Sheol h7585)
१६गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडे, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला. (Sheol h7585)
17 Denn sie mußten auch mit ihm hinunter zur Hölle, zu den Erschlagenen mit dem Schwert, weil sie unter dem Schatten seines Arms gewohnt hatten unter den Heiden. (Sheol h7585)
१७जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तलवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. (Sheol h7585)
18 Wie groß meinst du denn, Pharao, daß du seist mit deiner Pracht und Herrlichkeit unter den lustigen Bäumen? Denn du mußt mit den lustigen Bäumen unter die Erde hinabfahren und unter den Unbeschnittenen liegen, so mit dem Schwert erschlagen sind. Also soll es Pharao gehen samt allem seinem Volk, spricht der Herr HERR.
१८तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

< Hesekiel 31 >