< Jeremiah 2 >

1 Yahweh’s word came to me, saying,
परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 “Go and proclaim in the ears of Jerusalem, saying, ‘Yahweh says, “I remember for you the kindness of your youth, your love as a bride, how you went after me in the wilderness, in a land that was not sown.
“जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.
3 Israel was holiness to Yahweh, the first fruits of his increase. All who devour him will be held guilty. Evil will come on them,”’ says Yahweh.”
इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ. जो कोणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल, असे परमेश्वर म्हणतो.”
4 Hear Yahweh’s word, O house of Jacob, and all the families of the house of Israel!
याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
5 Yahweh says, “What unrighteousness have your fathers found in me, that they have gone far from me, and have walked after worthless vanity, and have become worthless?
परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?
6 They didn’t say, ‘Where is Yahweh who brought us up out of the land of Egypt, who led us through the wilderness, through a land of deserts and of pits, through a land of drought and of the shadow of death, through a land that no one passed through, and where no man lived?’
कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?”
7 I brought you into a plentiful land to eat its fruit and its goodness; but when you entered, you defiled my land, and made my heritage an abomination.
पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.
8 The priests didn’t say, ‘Where is Yahweh?’ and those who handle the law didn’t know me. The rulers also transgressed against me, and the prophets prophesied by Baal and followed things that do not profit.
“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही! राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.”
9 “Therefore I will yet contend with you,” says Yahweh, “and I will contend with your children’s children.
म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो.
10 For pass over to the islands of Kittim, and see. Send to Kedar, and consider diligently, and see if there has been such a thing.
१०कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
11 Has a nation changed its gods, which really are no gods? But my people have changed their glory for that which doesn’t profit.
११काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी? पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे.
12 “Be astonished, you heavens, at this and be horribly afraid. Be very desolate,” says Yahweh.
१२“आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.
13 “For my people have committed two evils: they have forsaken me, the spring of living waters, and cut out cisterns for themselves: broken cisterns that can’t hold water.
१३कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.
14 Is Israel a slave? Is he born into slavery? Why has he become a captive?
१४“इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे?
15 The young lions have roared at him and raised their voices. They have made his land waste. His cities are burned up, without inhabitant.
१५तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे. त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही.
16 The children also of Memphis and Tahpanhes have broken the crown of your head.
१६नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.
17 “Haven’t you brought this on yourself, in that you have forsaken Yahweh your God, when he led you by the way?
१७तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.
18 Now what do you gain by going to Egypt, to drink the waters of the Shihor? Or why do you go on the way to Assyria, to drink the waters of the River?
१८तर आता, शिहोराचे पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे? आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी?
19 “Your own wickedness will correct you, and your backsliding will rebuke you. Know therefore and see that it is an evil and bitter thing, that you have forsaken Yahweh your God, and that my fear is not in you,” says the Lord, Yahweh of Armies.
१९तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
20 “For long ago I broke off your yoke, and burst your bonds. You said, ‘I will not serve;’ for on every high hill and under every green tree you bowed yourself, playing the prostitute.
२०“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.
21 Yet I had planted you a noble vine, a pure and faithful seed. How then have you turned into the degenerate branches of a foreign vine to me?
२१पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.
22 For though you wash yourself with lye, and use much soap, yet your iniquity is marked before me,” says the Lord Yahweh.
२२जरी तू स्वत: ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले, तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो.
23 “How can you say, ‘I am not defiled. I have not gone after the Baals’? See your way in the valley. Know what you have done. You are a swift dromedary traversing her ways,
२३“मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पाहा! तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
24 a wild donkey used to the wilderness, that sniffs the wind in her craving. When she is in heat, who can turn her away? All those who seek her will not weary themselves. In her month, they will find her.
२४जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल.
25 “Keep your feet from being bare, and your throat from thirst. But you said, ‘It is in vain. No, for I have loved strangers, and I will go after them.’
२५तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.
26 As the thief is ashamed when he is found, so the house of Israel is ashamed— they, their kings, their princes, their priests, and their prophets,
२६चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
27 who tell wood, ‘You are my father,’ and a stone, ‘You have given birth to me,’ for they have turned their back to me, and not their face, but in the time of their trouble they will say, ‘Arise, and save us!’
२७हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.” कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी, ते आपल्या संकटात म्हणतील, “उठ आणि आम्हांला तार.”
28 “But where are your gods that you have made for yourselves? Let them arise, if they can save you in the time of your trouble, for you have as many gods as you have towns, O Judah.
२८तर तुम्ही स्वत: साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!
29 “Why will you contend with me? You all have transgressed against me,” says Yahweh.
२९“तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.
30 “I have struck your children in vain. They received no correction. Your own sword has devoured your prophets, like a destroying lion.
३०“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”
31 Generation, consider Yahweh’s word. Have I been a wilderness to Israel? Or a land of thick darkness? Why do my people say, ‘We have broken loose. We will come to you no more’?
३१जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?
32 “Can a virgin forget her ornaments, or a bride her attire? Yet my people have forgotten me for days without number.
३२कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
33 How well you prepare your way to seek love! Therefore you have even taught the wicked women your ways.
३३प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस.
34 Also the blood of the souls of the innocent poor is found in your skirts. You didn’t find them breaking in, but it is because of all these things.
३४गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.
35 “Yet you said, ‘I am innocent. Surely his anger has turned away from me.’ “Behold, I will judge you, because you say, ‘I have not sinned.’
३५या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.” पण पाहा, “मी पाप केले नाही” या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार.
36 Why do you go about so much to change your ways? You will be ashamed of Egypt also, as you were ashamed of Assyria.
३६तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस? अश्शूरविषयी जशी तू निराश झालीस, तशी तू मिसरविषयीही निराश होशील.
37 You will also leave that place with your hands on your head; for Yahweh has rejected those in whom you trust, and you won’t prosper with them.
३७आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील. कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.

< Jeremiah 2 >