< 1 Kings 22 >

1 For almost three years there was no war between Syria and Israel.
पुढील तीन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली.
2 Then King Jehoshaphat, who ruled Judah, went to [visit] King Ahab, who ruled Israel.
तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाचा राजा याला भेटायला गेला.
3 [While they were talking, ] Ahab said to his officials, “Do you realize that the Syrians are still occupying our city of Ramoth in [the] Gilead [region]? And we are doing nothing to retake that city!”
यावेळी इस्राएलाच्या राजाने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामाच्या राजाने रामोथ-गिलाद आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.”
4 Then he turned to Jehoshaphat and asked, “Will your [army] join my [army] to fight against the people of Ramoth [and retake that city]?” Jehoshaphat replied, “[Certainly] I [will do whatever] you [want], and you may command my troops. You may take my horses into battle, also.”
आणि इस्राएल राजा यहोशाफाटाला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्याशी लढाल का?” यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत.”
5 Then he added, “But we should ask Yahweh first, to find out what he wants us to do.”
यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
6 So Ahab summoned about 400 of his prophets together, and he asked them, “Should my [army] go to fight the people in Ramoth and retake that city, or not?” They answered, “Yes, go [and attack them], because God will enable your [army] to defeat them.”
तेव्हा इस्राएलाच्या राजाने संदेष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. राजाने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ-गिलाद येथे अरामी फौजेवर चालून जावे का?” की काही काळ थांबावे? संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हास जय मिळवून देईल.”
7 But Jehoshaphat asked, “Is there no prophet of Yahweh here whom we can ask?”
पण यहोशाफाटाने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”
8 The King of Israel replied, “There is one man we can talk to. We can ask him if he can find out what Yahweh wants. His name is Micaiah; he is the son of Imlah. But I hate him, because when he (prophesies/tells what God says to him) he never says [that] anything good [will happen] to me. He always predicts [that] bad things [will happen to me].” Jehoshaphat replied, “King Ahab, you should not say that!”
इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”
9 So the king of Israel told one of his officers to summon Micaiah immediately.
तेव्हा इस्राएलाच्या राजाने आपल्या एका सेवकाला “इम्लाचा पुत्र मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.”
10 The king of Israel and the king of Judah were wearing their (royal robes/robes that showed that they were kings). They were sitting on thrones at the place where people threshed grain, near the gate of Samaria [city]. All of Ahab’s prophets were standing in front of the kings, (prophesying/predicting what was going to happen).
१०यावेळी इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्याठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालेले होते.
11 One of them, whose name was Zedekiah, the son of Kenaanah, had made from iron [something that resembled] horns of a bull. Then he proclaimed [to Ahab], “This is what Yahweh says: ‘With horns like these your [army] will keep attacking the Syrians [like a bull attacks another animal] [MET], until you completely destroy them!’”
११त्यांच्यापैकी एक कनानाचा पुत्र सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे हे आहे की ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”
12 All the [other] prophets [of Ahab] agreed. They said, “Yes! If you go up to attack Ramoth [city] in [the] Gilead [region], you will be successful, because Yahweh will enable you to defeat them!”
१२मग ते सर्वच भविष्यवादी भविष्य सांगत होते. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ-गिलाद येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
13 Meanwhile, the messenger who went to summon Micaiah said to him, “Listen to me! All the other prophets are predicting that the king’s army will defeat the Syrians. So be sure that you agree with them and say (what will be favorable/that the king’s army will be successful).”
१३हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला व त्यास भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”
14 But Micaiah replied, “As surely as Yahweh lives, I will tell him only what Yahweh tells me to say.”
१४पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”
15 When Micaiah came to Ahab, Ahab asked him, “Micaiah, should we go to fight against [the people of] Ramoth, or not?” Micaiah replied, “Sure, go! Yahweh will enable your army to defeat them!”
१५मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्यास विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथ-गिलाद अरामाच्या सैन्यावर आता चढाई करु का?” मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हास यश देईल.”
16 But King Ahab [realized that Micaiah was (lying/being sarcastic), so he] said to Micaiah, “I have told you [RHQ] many times that you must always tell only the truth when you say what Yahweh [has revealed to you]!”
१६पण राजा त्यास म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनाचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. अशी शपथ कितीदा मी तुला देऊ?”
17 So Micaiah said to him, “[The truth is that] in a vision I saw all the troops of Israel scattered on the mountains. They seemed to be like sheep that did not have a shepherd. And Yahweh said, ‘Their master has been killed. So tell them all to go home peacefully.’”
१७तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलाचे सैन्य डोंगरांवर इतस्तत: पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘यांना कोणी नेता नाही. यांनी सुखरूप घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.”
18 Ahab said to Jehoshaphat, “I told you [RHQ] that he never predicts [that] anything good [will happen to me]! He [always] predicts [that] bad things [will happen to me].”
१८मग इस्राएलाच्या राजा यहोशाफाटाला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”
19 But Micaiah continued, saying, “Listen to what Yahweh showed to me! [In a vision] I saw Yahweh sitting on his throne, with all the armies of heaven surrounding him, on his right side and on his left side.
१९इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो: ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. आकाशातले त्याचे सर्व सैन्य त्याच्या शेजारी उभे आहे.
20 And Yahweh said, ‘Who can persuade Ahab to go to fight against the people of Ramoth, in order that he may be killed there?’ Some suggested one thing, and others suggested something else.
२०परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.
21 Finally one [evil] spirit came to Yahweh and said, ‘I can do it!’
२१मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’
22 Yahweh asked him, ‘How will you do it?’ The spirit replied, ‘I will go and inspire all of Ahab’s prophets to tell lies.’ Yahweh said, ‘You will be successful; go and do it!’
२२परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल.
23 So now [I tell you that] Yahweh has caused all of your prophets to lie to you. Yahweh has decided that something terrible will happen to you.”
२३मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, तेव्हा खरी हकिकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरास वाटते.”
24 Then Zedekiah walked over to Micaiah and slapped him on his face. He said, “Do you think that Yahweh’s Spirit left me in order to speak to you?” [RHQ]
२४मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”
25 Micaiah replied, “You will find out for yourself [which of us Yahweh’s Spirit has truly spoken to] on the day when you go into a room of some house to hide [from the Syrian troops]!”
२५मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
26 King Ahab commanded [his soldiers], “Seize Micaiah and take him to Amon, the governor of this city, and to my son Joash.
२६तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
27 Tell them that I have commanded that they should put this man in prison and give him only bread and water. Do not give him anything else to eat until I return safely from the battle!”
२७आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
28 Micaiah replied, “If you return safely, [it will be clear that] it was not Yahweh who told me what to say to you!” Then he said [to all those who were standing there], “Do not forget what I have said [to King Ahab]!”
२८मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
29 So the King of Israel and the King of Judah [led their armies] to Ramoth, in [the] Gilead [region].
२९नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
30 King Ahab said to Jehoshaphat, “I will put on different clothes, [in order that no one will recognize that I am the king]. But you should wear your (royal robe/robe that shows that you are a king).” So Ahab disguised himself, and they both went into the battle.
३०अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
31 The King of Syria told this to his thirty-two men who were driving the chariots: “Attack only the king of Israel!”
३१अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.
32 So when the men who were driving the Syrian chariots saw Jehoshaphat [wearing (his royal robes/clothes that showed he was the king)], they pursued him. They shouted, “There is the king of Israel!” But when Jehoshaphat cried out,
३२तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला.
33 they realized that he was not the king of Israel. So they stopped pursuing him.
३३हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.
34 But one [Syrian] soldier shot an arrow at Ahab, without knowing that it was Ahab. The arrow struck Ahab between the places where the parts of his armor joined together. Ahab told the driver of his chariot, “Turn the chariot around and take me out of here! I have been severely wounded!”
३४तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नक्की इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दूर जाऊ.”
35 The battle continued all the day. Ahab was sitting propped up in his chariot, facing the Syrian troops. The blood from his wound ran down to the floor of the chariot. And late in the afternoon he died.
३५युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामाच्या सैन्याकडे पाहत होता. त्यास एवढा रक्तस्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला.
36 Just as the sun was going down, someone among the Israeli troops shouted, “[The battle is ended!] Everyone should return home!”
३६सूर्यास्ताच्या वेळी “इस्राएलाच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.”
37 So king Ahab died, and they took his body [in the chariot] to Samaria [city] and buried his body there.
३७राजा अहाबाला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनाला आणला. त्यास त्यांनी तिथे पुरले.
38 They washed his chariot alongside the pool in Samaria, a pool where the prostitutes bathed. And dogs [came and] licked the king’s blood, just like Yahweh had predicted would happen.
३८शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबाच्या रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नक्की घडले.
39 The account/record of the other things that happened while Ahab was ruling, and about the palace decorated with much ivory [that they built for him], and the cities that were built for him, was written in the scroll called ‘The History of the Kings of Israel’.
३९इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबाच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे.
40 When Ahab died, his body was buried where his ancestors were buried. Then his son Ahaziah became king.
४०अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
41 Before King Ahab died, when he had been ruling in Israel for four years, Asa’s son Jehoshaphat started to rule in Judah.
४१अहाब इस्राएलाचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र.
42 Jehoshaphat was thirty-five years old when he started to rule, and he ruled in Jerusalem for twenty-five years. His mother was Azubah, the daughter of Shilhi.
४२यहोशाफाट वयाच्या पस्तीसाव्या वर्षी राजा झाला आणि यरूशलेमामध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची कन्या.
43 Jehoshaphat was a good king, just like his father Asa had been. He did things that pleased Yahweh. But while he was king, he did not remove all the pagan altars [that the people had built] on the hilltops. So the people continued to offer sacrifices [to idols] on those altars and burned incense there.
४३यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपले वडिल आसा ह्यांच्याप्रमाणेच वागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटाने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्याठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.
44 Jehoshaphat also made [a] peace [agreement] with the king of Israel.
४४यहोशाफाट राजाने इस्राएलाच्या राजाशी शांततेचा करार केला.
45 All the other things that happened while Jehoshaphat was ruling, and the great things that he did and the victories his [troops] won, are written in the scroll called ‘The History of the Kings of Judah’.
४५राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.
46 Jehoshaphat’s father Asa [had tried to expel] the male prostitutes that stayed at the pagan shrines, but some of them were still there. Jehoshaphat got rid of them.
४६त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले.
47 At that time, there was no king in Edom; a ruler who had been appointed by Jehoshaphat ruled there.
४७याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहत असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.
48 Jehoshaphat [ordered some Israeli men to] build a fleet/group of ships to sail [south] to [the] Ophir [region] to get gold. But they were wrecked at Ezion-Geber/Elath, so the ships never sailed.
४८राजा यहोशाफाटाने तार्शीशी काही मालवाहू गलबते बांधली. त्यामध्ये त्याचा हेतू ओफिरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन-गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
49 Before the ships were wrecked, Ahab’s son Ahaziah suggested to Jehoshaphat, “Allow my sailors to go with your sailors,” but Jehoshaphat refused.
४९इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र अहज्या याने यहोशाफाटाला मदतीचा हात दिला. “त्याच्या मनुष्यांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली.” पण अहज्याची कुमक स्विकारण्यास यहोशाफाटाने नकार दिला.
50 When Jehoshaphat died, his [body] was buried where his ancestors were buried in [Jerusalem, ] the city where King David [had ruled]. Then Jehoshaphat’s son Jehoram became king.
५०यहोशाफाट मरण पावला त्यानंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राज्य करु लागला.
51 Before King Jehoshaphat died, when he had been ruling in Judah for 17 years, Ahab’s son Ahaziah began to rule in Israel. Ahaziah ruled in Samaria for two years.
५१अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
52 He did many things that Yahweh considered to be evil, doing the [evil] things that his father and mother had done and the evil things that Jeroboam had done—the king who had led all the Israeli people to sin [by worshiping idols].
५२अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले.
53 Ahaziah bowed in front of Baal’s idol and worshiped it. That caused Yahweh, the God who was the true God of the Israeli people, to become very angry, just as Ahaziah’s father had caused Yahweh to become angry.
५३आपल्या वडिलांप्रमाणेच अहज्यानेही बआल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबावर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

< 1 Kings 22 >