< 诗篇 75 >

1 亚萨的诗歌,交与伶长。调用休要毁坏。 神啊,我们称谢你,我们称谢你! 因为你的名相近,人都述说你奇妙的作为。
आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
2 我到了所定的日期, 必按正直施行审判。
नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
3 地和其上的居民都消化了; 我曾立了地的柱子。 (细拉)
जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
4 我对狂傲人说:不要行事狂傲! 对凶恶人说:不要举角!
मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
5 不要把你们的角高举; 不要挺着颈项说话。
विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.
6 因为高举非从东,非从西, 也非从南而来。
विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.
7 惟有 神断定; 他使这人降卑,使那人升高。
पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
8 耶和华手里有杯, 其中的酒起沫,杯内满了搀杂的酒; 他倒出来, 地上的恶人必都喝这酒的渣滓,而且喝尽。
कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
9 但我要宣扬,直到永远! 我要歌颂雅各的 神!
पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
10 恶人一切的角,我要砍断; 惟有义人的角必被高举。
१०तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे उंच करीन.

< 诗篇 75 >