< Galaziarrei 2 >

1 Guero hamalaur vrtheren buruän, berriz igan nendin Ierusalemera Barnabasequin, eta Tite-ere harturic.
नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले.
2 Eta igan nendin reuelationez, eta hæy communica niecén Gentilén artean predicatzen dudan Euangelioa, baina particularqui estimatan diradeney, neholere alfer laster aznaguian edo eguin eznuen.
मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.
3 Baina Tite-ere, cein baitzén enequin, Grec bacen-ere, etzedin bortcha circonciditu içatera.
पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.
4 Anaye falsu Eliçán bere buruz nahastecatuén causaz, cein sar baitzitecen gure libertate Iesus Christean dugunaren espia içatera, gu suiectionetara erekar guençatençát.
आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
5 Eta suiectionez ezquitzaizte susmettitu momentbat-ere, Euangelioco eguiác çuetan iraun leçançát.
शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
6 Eta eztut deus ikassi cerbait diradela irudi dutenetaric (nolaco noizpait içan diraden, etzait deus hunquitzen: ecen Iaincoac eztu guiçonaren campoco apparentiá hartzen) ecen estimatan diradenéc eztraudaté deus guehiagoric communicatu.
तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही.
7 Baina contrariora, ikussi vkan çutenean ecen Preputioco Euangelioaren predicationea niri eman içan çaitadala, Circoncisionecoa Pierrisi beçala:
तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.
8 (Ecen Pierris baithan obratu vkan duenac Circoncisioneco Apostolutassunera, obratu vkan du ni baithan-ere Gentiletara.)
कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
9 Eta eçagutu çutenean niri eman içan çaitadan gratiá, Iacquesec eta Cephasec eta Ioannesec (habe diradela estimatuéc) lagunçazco escuinac eman drauzquigute niri eta Barnabasi: gu Gentiletarát guendoacençát eta hec Circoncisionecoètarat:
आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.
10 Solament auisatu gaituzte paubréz orhoit guentecen: eta haren beraren eguitera arthatsu içan naiz.
१०मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.
11 Eta ethorri, içan cenean Pierris Antiochera, bekoquiz resisti nieçon hari, ceren reprehenditzeco baitzén.
११आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.
12 Ecén Iacquesganic batzu ethor citecen baino lehen, Gentilequin batean iaten çuen: baina ethorri içan ciradenean, retira eta separa cedin hetaric Circoncisionecoén beldurrez.
१२कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.
13 Eta simulationez vsatzen çuten harequin batean berce Iuduec-ere: hala non Barnabas-ere erekarri içan baitzén hayén simulationera.
१३तेव्हा तसेच दुसर्‍या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.
14 Baina ikussi vkan nuenean ecen etzabiltzala oin chuchenez, Euangelioco eguiaren araura, erran nieçón Pierrisi gucien aitzinean, Baldin hi Iudu aicelaric Gentil anço vici bahaiz, eta ez Iudu anço, cergatic Gentilac bortchatzen dituc iudaizatzera?
१४पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”
15 Gu baicara naturaz Iudu, eta ez Gentiletaric bekatore.
१५आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही.
16 Daquigularic ecen eztela guiçona iustificatzen Legueco obréz, baina Iesus Christen fedeaz: guc-ere Iesus Christ baithan sinhetsi vkan dugu, iustifica guentecençát Christen fedeaz, eta ez Legueco obréz: ceren haraguiric batre ezpaita iustificaturen Legueco obréz,
१६तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
17 Eta baldin Christez iustificatu nahiz gabiltzalaric, erideiten bagara gueuror-ere bekatore, Christ halacotz bekatuaren ministre da? Guertha eztadila.
१७पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही.
18 Ecen baldin deseguin ditudan gauçác harçara edificatzen baditut, transgressor neure buruä eguiten dut.
१८कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन.
19 Ecen ni Legueaz Legueari hil içan nazayó, Iaincoari vici nequionçat, Christequin batean crucificatu içan naiz.
१९कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे.
20 Bada vici naiz, ez guehiagoric ni, baina vici da nitan Christ eta orain haraguian vici naicen vicitzeaz Iaincoaren Semearen fedeaz vici naiz, ceinec onhetsi vkan bainau, eta eman vkan baitu bere buruä enegatic.
२०मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
21 Eztut abolitzen Iaincoaren gratiá: ecen baldin iustitiá Legueaz bada, beraz Christ mengoa gabe hil içan da.
२१मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.

< Galaziarrei 2 >