< ԱՌԱՋԻՆ ՊԵՏՐՈՍԻ 5 >

1 Կը յորդորեմ ձեր մէջ եղող երէցները, ե՛ս ալ ըլլալով երէց իրենց պէս, Քրիստոսի չարչարանքներուն վկայ, նաեւ հաղորդակից այն փառքին՝ որ պիտի յայտնուի.-
तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
2 հովուեցէ՛ք Աստուծոյ հօտը՝ որ ձեր մէջ է, տեսուչ ըլլալով՝ ո՛չ թէ հարկադրաբար, հապա՝ կամովին. ո՛չ թէ ամօթալի շահախնդրութեամբ, հապա՝ յօժարութեամբ.
तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा
3 ո՛չ ալ տիրապետելով թեմին վրայ, հապա՝ տիպար ըլլալով հօտին.
आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा.
4 ու երբ Հովուապետը երեւնայ, պիտի ստանաք փառքի անթառամ պսակը:
आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा मुकुट मिळेल.
5 Նմանապէս դո՛ւք, դեռատինե՛ր, հպատակեցէ՛ք տարեցներուն: Բոլորդ իրարու հպատակելով՝ խոնարհութի՛ւն հագէք. որովհետեւ «Աստուած կ՚ընդդիմանայ ամբարտաւաններուն, բայց շնորհք կու տայ խոնարհներուն»:
तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.
6 Ուրեմն խոնարհեցէ՛ք Աստուծոյ հզօր ձեռքին տակ, որպէսզի ժամանակին բարձրացնէ ձեզ:
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे.
7 Ձեր ամէն հոգը ձգեցէ՛ք անոր վրայ, որովհետեւ ան կը հոգայ ձեզ:
तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
8 Զգա՛ստ եղէք, արթո՛ւն կեցէք. որովհետեւ ձեր ոսոխը՝ Չարախօսը՝ կը շրջի մռնչող առիւծի պէս, փնտռելով թէ ո՛վ կլլէ:
सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.
9 Դիմադրեցէ՛ք անոր՝ ամուր հաւատքով, գիտնալով թէ ձեր եղբայրնե՛րն ալ աշխարհի մէջ կը կրեն նոյն չարչարանքները:
तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुध्द उभे रहा कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत.
10 Եւ ամէն շնորհքի Աստուածը, որ իր յաւիտենական փառքին կանչեց մեզ Քրիստոս Յիսուսի միջոցով, ձեզ կատարեալ պիտի ընէ, ամրացնէ, ուժովցնէ եւ անսասան հիմերու վրայ դնէ, երբ չարչարուիք քիչ մը ատեն: (aiōnios g166)
१०पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. (aiōnios g166)
11 Իրե՛ն են փառքը եւ զօրութիւնը դարէ դար՝՝: Ամէն: (aiōn g165)
११त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. (aiōn g165)
12 Սիղուանոսի միջոցով, որ՝ ինչպէս կը սեպեմ՝ հաւատարիմ եղբայր մըն է, գրեցի ձեզի համառօտաբար, յորդորելով ու վկայելով թէ ա՛յս է Աստուծոյ ճշմարիտ շնորհքը, որուն մէջ հաստատ կեցած էք:
१२मी ज्या सिल्वानला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्याहाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर रहा.
13 Կը բարեւէ ձեզ Բաբելոնի մէջ եղած եկեղեցին, որ ընտրուած է ձեզի հետ, նաեւ Մարկոս՝ իմ որդիս:
१३बाबेल येथील, तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे आणि माझा मुलगा मार्क हाही पाठवत आहे
14 Բարեւեցէ՛ք զիրար սիրոյ համբոյրով: Խաղաղութի՜ւն ձեր բոլորին՝ որ Քրիստոս Յիսուսի մէջ էք: Ամէն:
१४प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.

< ԱՌԱՋԻՆ ՊԵՏՐՈՍԻ 5 >