< اَلْمَزَامِيرُ 53 >

لِإِمَامِ ٱلْمُغَنِّينَ عَلَى «ٱلْعُودِ». قَصِيدَةٌ لِدَاوُدَ قَالَ ٱلْجَاهِلُ فِي قَلْبِهِ: «لَيْسَ إِلَهٌ». فَسَدُوا وَرَجِسُوا رَجَاسَةً. لَيْسَ مَنْ يَعْمَلُ صَلَاحًا. ١ 1
दाविदाचे स्तोत्र मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
ٱللهُ مِنَ ٱلسَّمَاءِ أَشْرَفَ عَلَى بَنِي ٱلْبَشَرِ لِيَنْظُرَ: هَلْ مِنْ فَاهِمٍ طَالِبِ ٱللهِ؟ ٢ 2
देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.
كُلُّهُمْ قَدِ ٱرْتَدُّوا مَعًا، فَسَدُوا. لَيْسَ مَنْ يَعْمَلُ صَلَاحًا، لَيْسَ وَلَا وَاحِدٌ. ٣ 3
त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
أَلَمْ يَعْلَمْ فَاعِلُو ٱلْإِثْمِ، ٱلَّذِينَ يَأْكُلُونَ شَعْبِي كَمَا يَأْكُلُونَ ٱلْخُبْزَ، وَٱللهَ لَمْ يَدْعُوا؟ ٤ 4
ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही.
هُنَاكَ خَافُوا خَوْفًا، وَلَمْ يَكُنْ خَوْفٌ، لِأَنَّ ٱللهَ قَدْ بَدَّدَ عِظَامَ مُحَاصِرِكَ. أَخْزَيْتَهُمْ لِأَنَّ ٱللهَ قَدْ رَفَضَهُمْ. ٥ 5
तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
لَيْتَ مِنْ صِهْيَوْنَ خَلَاصَ إِسْرَائِيلَ. عِنْدَ رَدِّ ٱللهِ سَبْيَ شَعْبِهِ، يَهْتِفُ يَعْقُوبُ، وَيَفْرَحُ إِسْرَائِيلُ. ٦ 6
अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!

< اَلْمَزَامِيرُ 53 >