< اَلْعَدَد 36 >

وَتَقَدَّمَ رُؤُوسُ ٱلْآبَاءِ مِنْ عَشِيرَةِ بَنِي جِلْعَادَ بْنِ مَاكِيرَ بْنِ مَنَسَّى مِنْ عَشَائِرِ بَنِي يُوسُفَ، وَتَكَلَّمُوا قُدَّامَ مُوسَى وَقُدَّامَ ٱلرُّؤَسَاءِ رُؤُوسِ ٱلْآبَاءِ مِنْ بَنِي إِسْرَائِيلَ، ١ 1
नंतर योसेफवंशाच्या कुळातला मनश्शेचा मुलगा माखीर याचा मुलगा गिलाद याच्या वंशातल्या घराण्यातील प्रमुख जवळ आले ते मोशेपुढे व इस्राएल लोकांच्या घराण्यातील प्रमुखांशी बोलायला गेले.
وَقَالُوا: «قَدْ أَمَرَ ٱلرَّبُّ سَيِّدِي أَنْ يُعْطِيَ ٱلْأَرْضَ بِقِسْمَةٍ بِٱلْقُرْعَةِ لِبَنِي إِسْرَائِيلَ. وَقَدْ أُمِرَ سَيِّدِي مِنَ ٱلرَّبِّ أَنْ يُعْطِيَ نَصِيبَ صَلُفْحَادَ أَخِينَا لِبَنَاتِهِ. ٢ 2
ते म्हणाले, परमेश्वराने इस्राएलाला चिठ्ठ्या टाकून आमचे वतन घेण्याची आमच्या स्वामींना आज्ञा केली आहे. याप्रकारे परमेश्वराने सलाफहादची जमीन त्याच्या मुलींना द्यायची आज्ञा केली आहे. सलाफहाद आमचा भाऊ होता.
فَإِنْ صِرْنَ نِسَاءً لِأَحَدٍ مِنْ بَنِي أَسْبَاطِ بَنِي إِسْرَائِيلَ، يُؤْخَذُ نَصِيبُهُنَّ مِنْ نَصِيبِ آبَائِنَا وَيُضَافُ إِلَى نَصِيبِ ٱلسِّبْطِ ٱلَّذِي صِرْنَ لَهُ. فَمِنْ قُرْعَةِ نَصِيبِنَا يُؤْخَذُ. ٣ 3
आता जर त्या इस्राएलाच्या वंशातल्या दुसऱ्या कोणत्याही वंशांच्या मुलाशी विवाह केला तर त्यांचे वतन आमच्या वडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल.
وَمَتَى كَانَ ٱلْيُوبِيلُ لِبَنِي إِسْرَائِيلَ يُضَافُ نَصِيبُهُنَّ إِلَى نَصِيبِ ٱلسِّبْطِ ٱلَّذِي صِرْنَ لَهُ، وَمِنْ نَصِيبِ سِبْطِ آبَائِنَا يُؤْخَذُ نَصِيبُهُنَّ». ٤ 4
आणि जेव्हा इस्राएलाच्या वंशाचे योबेल होईल तेव्हा ज्यांच्या त्या होतील त्यांच्या वंशाच्या वतनात त्यांचे वतन मिळवले जाईल, अशाने त्यांचे वतन आमच्या वडिलांच्यावंशाच्या वतनातून काढून टाकले जाईल.
فَأَمَرَ مُوسَى بَنِي إِسْرَائِيلَ حَسَبَ قَوْلِ ٱلرَّبِّ قَائِلًا: «بِحَقٍّ تَكَلَّمَ سِبْطُ بَنِي يُوسُفَ. ٥ 5
मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून इस्राएल लोकांस ही आज्ञा दिली, तो म्हणाला, योसेफाच्या वंशाचे म्हणणे बरोबर आहे.
هَذَا مَا أَمَرَ بِهِ ٱلرَّبُّ عَنْ بَنَاتِ صَلُفْحَادَ قَائِلًا: مَنْ حَسُنَ فِي أَعْيُنِهِنَّ يَكُنَّ لَهُ نِسَاءً، وَلَكِنْ لِعَشِيرَةِ سِبْطِ آبَائِهِنَّ يَكُنَّ نِسَاءً. ٦ 6
सलाफहादाच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: जर तुम्हास कोणाशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वंशातील कोणाशी तरी लग्न करा.
فَلَا يَتَحَوَّلُ نَصِيبٌ لِبَنِي إِسْرَائِيلَ مِنْ سِبْطٍ إِلَى سِبْطٍ، بَلْ يُلَازِمُ بَنُو إِسْرَائِيلَ كُلُّ وَاحِدٍ نَصِيبَ سِبْطِ آبَائِهِ. ٧ 7
यामुळे इस्राएल लोकांमध्ये वतन एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली मनुष्यास त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन ठेवता येईल.
وَكُلُّ بِنْتٍ وَرَثَتْ نَصِيبًا مِنْ أَسْبَاطِ بَنِي إِسْرَائِيلَ تَكُونُ ٱمْرَأَةً لِوَاحِدٍ مِنْ عَشِيرَةِ سِبْطِ أَبِيهَا، لِكَيْ يَرِثَ بَنُو إِسْرَائِيلَ كُلُّ وَاحِدٍ نَصِيبَ آبَائِهِ، ٨ 8
आणि इस्राएल वंशातल्या कोणत्याही एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून वतन मिळाले तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली वतन ठेवता येईल.
فَلَا يَتَحَوَّلْ نَصِيبٌ مِنْ سِبْطٍ إِلَى سِبْطٍ آخَرَ، بَلْ يُلَازِمُ أَسْبَاطُ بَنِي إِسْرَائِيلَ كُلُّ وَاحِدٍ نَصِيبَهُ». ٩ 9
तेव्हा इस्राएल लोकांमध्ये वतन एक वंशाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली मनुष्य त्याच्या पूर्वजांकडून मिळालेले वतन जवळ बाळगू शकेल.
كَمَا أَمَرَ ٱلرَّبُّ مُوسَى كَذَلِكَ فَعَلَتْ بَنَاتُ صَلُفْحَادَ. ١٠ 10
१०सलाफहादच्या मुलींनी परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे पालन केले.
فَصَارَتْ مَحْلَةُ وَتِرْصَةُ وَحَجْلَةُ وَمِلْكَةُ وَنُوعَةُ بَنَاتُ صَلُفْحَادَ نِسَاءً لِبَنِي أَعْمَامِهِنَّ. ١١ 11
११म्हणून सलाफहादच्या महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ यांनी त्यांच्या चुलत भावांशी लग्न केले.
صِرْنَ نِسَاءً مِنْ عَشَائِرِ بَنِي مَنَسَّى بْنِ يُوسُفَ، فَبَقِيَ نَصِيبُهُنَّ فِي سِبْطِ عَشِيرَةِ أَبِيهِنَّ. ١٢ 12
१२योसेफाचा मुलगा मनश्शे याच्या वंशातील ते होते. म्हणून त्यांची वतने त्यांच्या वडिलांच्या कुळाकडेच राहिली.
هَذِهِ هِيَ ٱلْوَصَايَا وَٱلْأَحْكَامُ ٱلَّتِي أَوْصَى بِهَا ٱلرَّبُّ إِلَى بَنِي إِسْرَائِيلَ عَنْ يَدِ مُوسَى، فِي عَرَبَاتِ مُوآبَ عَلَى أُرْدُنِّ أَرِيحَا. ١٣ 13
१३परमेश्वराने यार्देनपाशी यरीहोजवळ मवाबाच्या मैदानात मोशेच्याद्वारे इस्राएलाच्या वंशाना दिलेल्या या आज्ञा व नियम आहेत.

< اَلْعَدَد 36 >