< إِشَعْيَاءَ 46 >

قَدْ جَثَا بِيلُ، ٱنْحَنَى نَبُو. صَارَتْ تَمَاثِيلُهُمَا عَلَى ٱلْحَيَوَانَاتِ وَٱلْبَهَائِمِ. مَحْمُولَاتُكُمْ مُحَمَّلَةٌ حِمْلًا لِلْمُعْيِي. ١ 1
बेल खाली वाकला आहे, नबो झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.
قَدِ ٱنْحَنَتْ. جَثَتْ مَعًا. لَمْ تَقْدِرْ أَنْ تُنَجِّيَ ٱلْحِمْلَ، وَهِيَ نَفْسُهَا قَدْ مَضَتْ فِي ٱلسَّبْيِ. ٢ 2
ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत, परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.
«اِسْمَعُوا لِي يَا بَيْتَ يَعْقُوبَ وَكُلَّ بَقِيَّةِ بَيْتِ إِسْرَائِيلَ، ٱلْمُحَمَّلِينَ عَلَيَّ مِنَ ٱلْبَطْنِ، ٱلْمَحْمُولِينَ مِنَ ٱلرَّحِمِ. ٣ 3
याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही, ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
وَإِلَى ٱلشَّيْخُوخَةِ أَنَا هُوَ، وَإِلَى ٱلشَّيْبَةِ أَنَا أَحْمِلُ. قَدْ فَعَلْتُ، وَأَنَا أَرْفَعُ، وَأَنَا أَحْمِلُ وَأُنَجِّي. ٤ 4
तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन. मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
بِمَنْ تُشَبِّهُونَنِي وَتُسَوُّونَنِي وَتُمَثِّلُونَنِي لِنَتَشَابَهَ؟. ٥ 5
तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल, या करता त्यांच्याशी आमची तुलना होईल?
«اَلَّذِينَ يُفْرِغُونَ ٱلذَّهَبَ مِنَ ٱلْكِيسِ، وَٱلْفِضَّةَ بِٱلْمِيزَانِ يَزِنُونَ. يَسْتَأْجِرُونَ صَائِغًا لِيَصْنَعَهَا إِلَهًا، يَخُرُّونَ وَيَسْجُدُونَ! ٦ 6
लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.
يَرْفَعُونَهُ عَلَى ٱلْكَتِفِ. يَحْمِلُونَهُ وَيَضَعُونَهُ فِي مَكَانِهِ لِيَقِفَ. مِنْ مَوْضِعِهِ لَا يَبْرَحُ. يَزْعَقُ أَحَدٌ إِلَيْهِ فَلَا يُجِيبُ. مِنْ شِدَّتِهِ لَا يُخَلِّصُهُ. ٧ 7
ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.
«اُذْكُرُوا هَذَا وَكُونُوا رِجَالًا. رَدِّدُوهُ فِي قُلُوبِكُمْ أَيُّهَا ٱلْعُصَاةُ. ٨ 8
या गोष्टींबद्दल विचार करा; तुम्ही बंडखोरांनो! कधीही दुर्लक्ष करू नका.
اُذْكُرُوا ٱلْأَوَّلِيَّاتِ مُنْذُ ٱلْقَدِيمِ، لِأَنِّي أَنَا ٱللهُ وَلَيْسَ آخَرُ. ٱلْإِلَهُ وَلَيْسَ مِثْلِي. ٩ 9
प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा, कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
مُخْبِرٌ مُنْذُ ٱلْبَدْءِ بِٱلْأَخِيرِ، وَمُنْذُ ٱلْقَدِيمِ بِمَا لَمْ يُفْعَلْ، قَائِلًا: رَأْيِي يَقُومُ وَأَفْعَلُ كُلَّ مَسَرَّتِي. ١٠ 10
१०मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
دَاعٍ مِنَ ٱلْمَشْرِقِ ٱلْكَاسِرَ، مِنْ أَرْضٍ بَعِيدَةٍ رَجُلَ مَشُورَتِي. قَدْ تَكَلَّمْتُ فَأُجْرِيهِ. قَضَيْتُ فَأَفْعَلُهُ. ١١ 11
११मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो; होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
«اِسْمَعُوا لِي يَا أَشِدَّاءَ ٱلْقُلُوبِ ٱلْبَعِيدِينَ عَنِ ٱلْبِرِّ. ١٢ 12
१२चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.
قَدْ قَرَّبْتُ بِرِّي، لَا يَبْعُدُ. وَخَلَاصِي لَا يَتَأَخَّرُ. وَأَجْعَلُ فِي صِهْيَوْنَ خَلَاصًا، لِإِسْرَائِيلَ جَلَالِي. ١٣ 13
१३मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.

< إِشَعْيَاءَ 46 >