< اَلْخُرُوجُ 22 >

«إِذَا سَرَقَ إِنْسَانٌ ثَوْرًا أَوْ شَاةً فَذَبَحَهُ أَوْ بَاعَهُ، يُعَوِّضُ عَنِ ٱلثَّوْرِ بِخَمْسَةِ ثِيرَانٍ، وَعَنِ ٱلشَّاةِ بِأَرْبَعَةٍ مِنَ ٱلْغَنَمِ. ١ 1
एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
إِنْ وُجِدَ ٱلسَّارِقُ وَهُوَ يَنْقُبُ، فَضُرِبَ وَمَاتَ، فَلَيْسَ لَهُ دَمٌ. ٢ 2
चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
وَلَكِنْ إِنْ أَشْرَقَتْ عَلَيْهِ ٱلشَّمْسُ، فَلَهُ دَمٌ. إِنَّهُ يُعَوِّضُ. إِنْ لَمْ يَكُنْ لَهُ يُبَعْ بِسَرِقَتِهِ. ٣ 3
परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
إِنْ وُجِدَتِ ٱلسَّرِقَةُ فِي يَدِهِ حَيَّةً، ثَوْرًا كَانَتْ أَمْ حِمَارًا أَمْ شَاةً، يُعَوِّضُ بِٱثْنَيْنِ. ٤ 4
चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
«إِذَا رَعَى إِنْسَانٌ حَقْلًا أَوْ كَرْمًا وَسَرَّحَ مَوَاشِيَهُ فَرَعَتْ فِي حَقْلِ غَيْرِهِ، فَمِنْ أَجْوَدِ حَقْلِهِ، وَأَجْوَدِ كَرْمِهِ يُعَوِّضُ. ٥ 5
कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
إِذَا خَرَجَتْ نَارٌ وَأَصَابَتْ شَوْكًا فَٱحْتَرَقَتْ أَكْدَاسٌ أَوْ زَرْعٌ أَوْ حَقْلٌ، فَٱلَّذِي أَوْقَدَ ٱلْوَقِيدَ يُعَوِّضُ. ٦ 6
जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
إِذَا أَعْطَى إِنْسَانٌ صَاحِبَهُ فِضَّةً أَوْ أَمْتِعَةً لِلْحِفْظِ، فَسُرِقَتْ مِنْ بَيْتِ ٱلْإِنْسَانِ، فَإِنْ وُجِدَ ٱلسَّارِقُ، يُعَوِّضُ بِٱثْنَيْنِ. ٧ 7
कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी.
وَإِنْ لَمْ يُوجَدِ ٱلسَّارِقُ يُقَدَّمُ صَاحِبُ ٱلْبَيْتِ إِلَى ٱللهِ لِيَحْكُمَ هَلْ لَمْ يَمُدَّ يَدَهُ إِلَى مُلْكِ صَاحِبِهِ. ٨ 8
परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
فِي كُلِّ دَعْوَى جِنَايَةٍ، مِنْ جِهَةِ ثَوْرٍ أَوْ حِمَارٍ أَوْ شَاةٍ أَوْ ثَوْبٍ أَوْ مَفْقُودٍ مَا، يُقَالُ: إِنَّ هَذَا هُوَ، تُقَدَّمُ إِلَى ٱللهِ دَعْوَاهُمَا. فَٱلَّذِي يَحْكُمُ ٱللهُ بِذَنْبِهِ، يُعَوِّضُ صَاحِبَهُ بِٱثْنَيْنِ. ٩ 9
जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
إِذَا أَعْطَى إِنْسَانٌ صَاحِبَهُ حِمَارًا أَوْ ثَوْرًا أَوْ شَاةً أَوْ بَهِيمَةً مَّا لِلْحِفْظِ، فَمَاتَ أَوِ ٱنْكَسَرَ أَوْ نُهِبَ وَلَيْسَ نَاظِرٌ، ١٠ 10
१०एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;
فَيَمِينُ ٱلرَّبِّ تَكُونُ بَيْنَهُمَا، هَلْ لَمْ يَمُدَّ يَدَهُ إِلَى مُلْكِ صَاحِبِهِ. فَيَقْبَلُ صَاحِبُهُ. فَلَا يُعَوِّضُ. ١١ 11
११तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
وَإِنْ سُرِقَ مِنْ عِنْدِهِ يُعَوِّضُ صَاحِبَهُ. ١٢ 12
१२त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
إِنِ ٱفْتُرِسَ يُحْضِرُهُ شَهَادَةً. لَا يُعَوِّضُ عَنِ ٱلْمُفْتَرَسِ. ١٣ 13
१३जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
وَإِذَا ٱسْتَعَارَ إِنْسَانٌ مِنْ صَاحِبِهِ شَيْئًا فَٱنْكَسَرَ أَوْ مَاتَ، وَصَاحِبُهُ لَيْسَ مَعَهُ، يُعَوِّضُ. ١٤ 14
१४जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
وَإِنْ كَانَ صَاحِبُهُ مَعَهُ لَا يُعَوِّضُ. إِنْ كَانَ مُسْتَأْجَرًا أَتَى بِأُجْرَتِهِ. ١٥ 15
१५जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.
«وَإِذَا رَاوَدَ رَجُلٌ عَذْرَاءَ لَمْ تُخْطَبْ، فَٱضْطَجَعَ مَعَهَا يَمْهُرُهَا لِنَفْسِهِ زَوْجَةً. ١٦ 16
१६आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
إِنْ أَبَى أَبُوهَا أَنْ يُعْطِيَهُ إِيَّاهَا، يَزِنُ لَهُ فِضَّةً كَمَهْرِ ٱلْعَذَارَى. ١٧ 17
१७तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
لَا تَدَعْ سَاحِرَةً تَعِيشُ. ١٨ 18
१८कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
كُلُّ مَنِ ٱضْطَجَعَ مَعَ بَهِيمَةٍ يُقْتَلُ قَتْلًا. ١٩ 19
१९पशुगमन करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
مَنْ ذَبَحَ لِآلِهَةٍ غَيْرِ ٱلرَّبِّ وَحْدَهُ، يُهْلَكُ. ٢٠ 20
२०परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
«وَلَا تَضْطَهِدِ ٱلْغَرِيبَ وَلَا تُضَايِقْهُ، لِأَنَّكُمْ كُنْتُمْ غُرَبَاءَ فِي أَرْضِ مِصْرَ. ٢١ 21
२१उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
لَا تُسِيءْ إِلَى أَرْمَلَةٍ مَّا وَلَا يَتِيمٍ. ٢٢ 22
२२विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
إِنْ أَسَأْتَ إِلَيْهِ فَإِنِّي إِنْ صَرَخَ إِلَيَّ أَسْمَعُ صُرَاخَهُ، ٢٣ 23
२३तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
فَيَحْمَى غَضَبِي وَأَقْتُلُكُمْ بِٱلسَّيْفِ، فَتَصِيرُ نِسَاؤُكُمْ أَرَامِلَ، وَأَوْلَادُكُمْ يَتَامَى. ٢٤ 24
२४व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
إِنْ أَقْرَضْتَ فِضَّةً لِشَعْبِي ٱلْفَقِيرِ ٱلَّذِي عِنْدَكَ فَلَا تَكُنْ لَهُ كَٱلْمُرَابِي. لَا تَضَعُوا عَلَيْهِ رِبًا. ٢٥ 25
२५तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.
إِنِ ٱرْتَهَنْتَ ثَوْبَ صَاحِبِكَ فَإِلَى غُرُوبِ ٱلشَّمْسِ تَرُدُّهُ لَهُ، ٢٦ 26
२६तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;
لِأَنَّهُ وَحْدَهُ غِطَاؤُهُ، هُوَ ثَوْبُهُ لِجِلْدِهِ، فِي مَاذَا يَنَامُ؟ فَيَكُونُ إِذَا صَرَخَ إِلَيَّ أَنِّي أَسْمَعُ، لِأَنِّي رَؤُوفٌ. ٢٧ 27
२७कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
«لَا تَسُبَّ ٱللهَ، وَلَا تَلْعَنْ رَئِيسًا فِي شَعْبِكَ. ٢٨ 28
२८तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
لَا تُؤَخِّرْ مِلْءَ بَيْدَرِكَ، وَقَطْرَ مِعْصَرَتِكَ، وَأَبْكَارَ بَنِيكَ تُعْطِينِي. ٢٩ 29
२९आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
كَذَلِكَ تَفْعَلُ بِبَقَرِكَ وَغَنَمِكَ. سَبْعَةَ أَيَّامٍ يَكُونُ مَعَ أُمِّهِ، وَفِي ٱلْيَوْمِ ٱلثَّامِنِ تُعْطِينِي إِيَّاهُ. ٣٠ 30
३०तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
وَتَكُونُونَ لِي أُنَاسًا مُقَدَّسِينَ. وَلَحْمَ فَرِيسَةٍ فِي ٱلصَّحْرَاءِ لَا تَأْكُلُوا. لِلْكِلَابِ تَطْرَحُونَهُ. ٣١ 31
३१तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.

< اَلْخُرُوجُ 22 >