< أفَسُس 3 >

بِسَبَبِ هَذَا أَنَا بُولُسُ، أَسِيرُ ٱلْمَسِيحِ يَسُوعَ لِأَجْلِكُمْ أَيُّهَا ٱلْأُمَمُ، ١ 1
या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.
إِنْ كُنْتُمْ قَدْ سَمِعْتُمْ بِتَدْبِيرِ نِعْمَةِ ٱللهِ ٱلْمُعْطَاةِ لِي لِأَجْلِكُمْ. ٢ 2
देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल;
أَنَّهُ بِإِعْلَانٍ عَرَّفَنِي بِٱلسِّرِّ. كَمَا سَبَقْتُ فَكَتَبْتُ بِٱلْإِيجَازِ. ٣ 3
जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे.
ٱلَّذِي بِحَسَبِهِ حِينَمَا تَقْرَأُونَهُ، تَقْدِرُونَ أَنْ تَفْهَمُوا دِرَايَتِي بِسِرِّ ٱلْمَسِيحِ. ٤ 4
जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल,
ٱلَّذِي فِي أَجْيَالٍ أُخَرَ لَمْ يُعَرَّفْ بِهِ بَنُو ٱلْبَشَرِ، كَمَا قَدْ أُعْلِنَ ٱلْآنَ لِرُسُلِهِ ٱلْقِدِّيسِينَ وَأَنْبِيَائِهِ بِٱلرُّوحِ: ٥ 5
ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संततीला सांगण्यात आले नव्हते.
أَنَّ ٱلْأُمَمَ شُرَكَاءُ فِي ٱلْمِيرَاثِ وَٱلْجَسَدِ وَنَوَالِ مَوْعِدِهِ فِي ٱلْمَسِيحِ بِٱلْإِنْجِيلِ. ٦ 6
हे रहस्य ते आहे की, परराष्ट्रीय येशू ख्रिस्तामध्ये शुभवर्तमानाद्वारे आमच्याबरोबर वारसदार आणि एकाच शरीराचे अवयव आहेत आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.
ٱلَّذِي صِرْتُ أَنَا خَادِمًا لَهُ حَسَبَ مَوْهِبَةِ نِعْمَةِ ٱللهِ ٱلْمُعْطَاةِ لِي حَسَبَ فِعْلِ قُوَّتِهِ. ٧ 7
देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी त्या शुभवर्तमानाचा सेवक झालो.
لِي أَنَا أَصْغَرَ جَمِيعِ ٱلْقِدِّيسِينَ، أُعْطِيَتْ هَذِهِ ٱلنِّعْمَةُ، أَنْ أُبَشِّرَ بَيْنَ ٱلْأُمَمِ بِغِنَى ٱلْمَسِيحِ ٱلَّذِي لَا يُسْتَقْصَى، ٨ 8
जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
وَأُنِيرَ ٱلْجَمِيعَ فِي مَا هُوَ شَرِكَةُ ٱلسِّرِّ ٱلْمَكْتُومِ مُنْذُ ٱلدُّهُورِ فِي ٱللهِ خَالِقِ ٱلْجَمِيعِ بِيَسُوعَ ٱلْمَسِيحِ. (aiōn g165) ٩ 9
आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. (aiōn g165)
لِكَيْ يُعَرَّفَ ٱلْآنَ عِنْدَ ٱلرُّؤَسَاءِ وَٱلسَّلَاطِينِ فِي ٱلسَّمَاوِيَّاتِ، بِوَاسِطَةِ ٱلْكَنِيسَةِ، بِحِكْمَةِ ٱللهِ ٱلْمُتَنَوِّعَةِ، ١٠ 10
१०यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे पुष्कळ प्रकारचे असलेले ज्ञान कळावे.
حَسَبَ قَصْدِ ٱلدُّهُورِ ٱلَّذِي صَنَعَهُ فِي ٱلْمَسِيحِ يَسُوعَ رَبِّنَا. (aiōn g165) ١١ 11
११देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे. (aiōn g165)
ٱلَّذِي بِهِ لَنَا جَرَاءَةٌ وَقُدُومٌ بِإِيمَانِهِ عَنْ ثِقَةٍ. ١٢ 12
१२ख्रिस्तामध्ये आम्हास त्याच्यावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास मिळाला आहे.
لِذَلِكَ أَطْلُبُ أَنْ لَا تَكِلُّوا فِي شَدَائِدِي لِأَجْلِكُمُ ٱلَّتِي هِيَ مَجْدُكُمْ. ١٣ 13
१३म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे.
بِسَبَبِ هَذَا أَحْنِي رُكْبَتَيَّ لَدَى أَبِي رَبِّنَا يَسُوعَ ٱلْمَسِيحِ، ١٤ 14
१४या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो,
ٱلَّذِي مِنْهُ تُسَمَّى كُلُّ عَشِيرَةٍ فِي ٱلسَّمَاوَاتِ وَعَلَى ٱلْأَرْضِ. ١٥ 15
१५ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
لِكَيْ يُعْطِيَكُمْ بِحَسَبِ غِنَى مَجْدِهِ، أَنْ تَتَأَيَّدُوا بِٱلْقُوَّةِ بِرُوحِهِ فِي ٱلْإِنْسَانِ ٱلْبَاطِنِ، ١٦ 16
१६त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.
لِيَحِلَّ ٱلْمَسِيحُ بِٱلْإِيمَانِ فِي قُلُوبِكُمْ، ١٧ 17
१७विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे
وَأَنْتُمْ مُتَأَصِّلُونَ وَمُتَأَسِّسُونَ فِي ٱلْمَحَبَّةِ، حَتَّى تَسْتَطِيعُوا أَنْ تُدْرِكُوا مَعَ جَمِيعِ ٱلْقِدِّيسِينَ، مَا هُوَ ٱلْعَرْضُ وَٱلطُّولُ وَٱلْعُمْقُ وَٱلْعُلْوُ، ١٨ 18
१८यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
وَتَعْرِفُوا مَحَبَّةَ ٱلْمَسِيحِ ٱلْفَائِقَةَ ٱلْمَعْرِفَةِ، لِكَيْ تَمْتَلِئُوا إِلَى كُلِّ مِلْءِ ٱللهِ. ١٩ 19
१९म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे.
وَٱلْقَادِرُ أَنْ يَفْعَلَ فَوْقَ كُلِّ شَيْءٍ، أَكْثَرَ جِدًّا مِمَّا نَطْلُبُ أَوْ نَفْتَكِرُ، بِحَسَبِ ٱلْقُوَّةِ ٱلَّتِي تَعْمَلُ فِينَا، ٢٠ 20
२०आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,
لَهُ ٱلْمَجْدُ فِي ٱلْكَنِيسَةِ فِي ٱلْمَسِيحِ يَسُوعَ إِلَى جَمِيعِ أَجْيَالِ دَهْرِ ٱلدُّهُورِ. آمِينَ. (aiōn g165) ٢١ 21
२१त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165)

< أفَسُس 3 >