< دَانِيآل 8 >

فِي ٱلسَّنَةِ ٱلثَّالِثَةِ مِنْ مُلْكِ بَيْلْشَاصَّرَ ٱلْمَلِكِ، ظَهَرَتْ لِي أَنَا دَانِيآلَ رُؤْيَا بَعْدَ ٱلَّتِي ظَهَرَتْ لِي فِي ٱلِٱبْتِدَاءِ. ١ 1
त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.
فَرَأَيْتُ فِي ٱلرُّؤْيَا، وَكَانَ فِي رُؤْيَايَ وَأَنا فِي شُوشَانَ ٱلْقَصْرِ ٱلَّذِي فِي وِلَايَةِ عِيلَامَ، وَرَأَيْتُ فِي الرُؤيَا وَأَنَا عِنْدَ نَهْرِ أُولَايَ. ٢ 2
मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.
فَرَفَعْتُ عَيْنَيَّ وَرَأَيْتُ وَإِذَا بِكَبْشٍ وَاقِفٍ عِنْدَ ٱلنَّهْرِ وَلَهُ قَرْنَانِ وَٱلقَرْنَانِ عَالِيَانِ، وَٱلْوَاحِدُ أَعْلَى مِنَ ٱلْآخَرِ، وَٱلْأَعْلَى طَالِعٌ أَخِيرًا. ٣ 3
मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती, आणि ते हळू वाढत आहे.
رَأَيْتُ ٱلْكَبْشَ يَنْطَحُ غَرْبًا وَشِمَالًا وَجَنُوبًا فَلَمْ يَقِفْ حَيَوَانٌ قُدَّامَهُ وَلَا مُنْقِذٌ مِنْ يَدِهِ، وَفَعَلَ كَمَرْضَاتِهِ وَعَظُمَ. ٤ 4
मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्यास जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.
وَبَيْنَمَا كُنْتُ مُتَأَمِّلًا إِذَا بِتَيْسٍ مِنَ ٱلْمَعْزِ جَاءَ مِنَ ٱلْمَغْرِبِ عَلَى وَجْهِ كُلِّ ٱلْأَرْضِ وَلَمْ يَمَسَّ ٱلْأَرْضَ، وَلِلتَّيْسِ قَرْنٌ مُعْتَبَرٌ بَيْنَ عَيْنَيْهِ. ٥ 5
जसा मी त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला. तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक मोठे शिंग होते.
وَجَاءَ إِلَى ٱلْكَبْشِ صَاحِبِ ٱلْقَرْنَيْنِ ٱلَّذِي رَأَيْتُهُ وَاقِفًا عِنْدَ ٱلنَّهْرِ وَرَكَضَ إِلَيْهِ بِشِدَّةِ قُوَّتِهِ. ٦ 6
मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.
وَرَأَيْتُهُ قَدْ وَصَلَ إِلَى جَانِبِ ٱلْكَبْشِ، فَٱسْتَشَاطَ عَلَيْهِ وَضَرَبَ ٱلْكَبْشَ وَكَسَرَ قَرْنَيْهِ، فَلَمْ تَكُنْ لِلْكَبْشِ قُوَّةٌ عَلَى ٱلْوُقُوفِ أَمَامَهُ، وَطَرَحَهُ عَلَى ٱلْأَرْضِ وَدَاسَهُ، وَلَمْ يَكُنْ لِلْكَبْشِ مُنْقِذٌ مِنْ يَدِهِ. ٧ 7
मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर रागे भरुन होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.
فتَعَظَّمَ تَيْسُ ٱلمَعْزِ جِدًّا. وَلَمَّا ٱعْتَزَّ ٱنْكَسَرَ ٱلْقَرْنُ ٱلْعَظِيمُ، وَطَلَعَ عِوَضًا عَنْهُ أَرْبَعَةُ قُرُونٍ مُعْتَبَرَةٍ نَحْوَ رِيَاحِ ٱلسَّمَاءِ ٱلْأَرْبَعِ. ٨ 8
मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबळ झाला, तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नवीन शिंगे फुटली ती चारही बाजूस ठळक होती.
وَمِنْ وَاحِدٍ مِنْهَا خَرَجَ قَرْنٌ صَغِيرٌ، وَعَظُمَ جِدًّا نَحْوَ ٱلْجَنُوبِ وَنَحْوَ ٱلشَّرْقِ وَنَحْوَ فَخْرِ ٱلْأَرَاضِي. ٩ 9
त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.
وَتَعَظَّمَ حَتَّى إِلَى جُنْدِ ٱلسَّمَاوَاتِ، وَطَرَحَ بَعْضًا مِنَ ٱلْجُنْدِ وَٱلنُّجُومِ إِلَى ٱلْأَرْضِ وَدَاسَهُمْ. ١٠ 10
१०त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.
وَحَتَّى إِلَى رَئِيسِ ٱلْجُنْدِ تَعَظَّمَ، وَبِهِ أُبْطِلَتِ ٱلْمُحْرَقَةُ ٱلدَّائِمَةُ، وَهُدِمَ مَسْكَنُ مَقْدِسِهِ. ١١ 11
११आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.
وَجُعِلَ جُنْدٌ عَلَى ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ بِٱلْمَعْصِيَةِ، فَطَرَحَ ٱلْحَقَّ عَلَى ٱلْأَرْضِ وَفَعَلَ وَنَجَحَ. ١٢ 12
१२आणि लोकांच्या पातकामुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले; तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले; आणि ते कार्य करीत व समृद्ध होत गेले.
فَسَمِعْتُ قُدُّوسًا وَاحِدًا يَتَكَلَّمُ. فَقَالَ قُدُّوسٌ وَاحِدٌ لِفُلَانٍ ٱلْمُتَكَلِّمِ: «إِلَى مَتَى ٱلرُّؤْيَا مِنْ جِهَةِ ٱلْمُحْرَقَةِ ٱلدَّائِمَةِ وَمَعْصِيَةِ ٱلْخَرَابِ، لِبَذْلِ ٱلْقُدْسِ وَٱلْجُنْدِ مَدُوسَيْنِ؟» ١٣ 13
१३नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”
فَقَالَ لِي: «إِلَى أَلْفَيْنِ وَثَلَاثِ مِئَةِ صَبَاحٍ وَمَسَاءٍ، فَيَتَبَرَّأُ ٱلْقُدْسُ». ١٤ 14
१४तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तीनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”
وَكَانَ لَمَّا رَأَيْتُ أَنَا دَانِيآلَ ٱلرُّؤْيَا وَطَلَبْتُ ٱلْمَعْنَى، إِذَا بِشِبْهِ إِنْسَانٍ وَاقِفٍ قُبَالَتِي. ١٥ 15
१५मग मी दानीएलाने हा दुष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पाहा एक मानवासारखा कोणी तरी माझ्यासमोर उभा होता.
وَسَمِعْتُ صَوْتَ إِنْسَانٍ بَيْنَ أُولَايَ، فَنَادَى وَقَالَ: «يَا جِبْرَائِيلُ، فَهِّمْ هَذَا ٱلرَّجُلَ ٱلرُّؤْيَا». ١٦ 16
१६मी एक मानवी वाणी ऐकली; ती उलई नदीच्या काठामधून आली ती म्हणाली, “गब्रीएला या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.”
فَجَاءَ إِلَى حَيْثُ وَقَفْتُ، وَلَمَّا جَاءَ خِفْتُ وَخَرَرْتُ عَلَى وَجْهِي. فَقَالَ لِي: «ٱفْهَمْ يَا ٱبْنَ آدَمَ. إِنَّ ٱلرُّؤْيَا لِوَقْتِ ٱلْمُنْتَهَى». ١٧ 17
१७मग तो, जेथे मी उभा होतो, तेथे आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”
وَإِذْ كَانَ يَتَكَلَّمُ مَعِي كُنْتُ مُسَبَّخًا عَلَى وَجْهِي إِلَى ٱلْأَرْضِ، فَلَمَسَنِي وَأَوْقَفَنِي عَلَى مَقَامِي. ١٨ 18
१८जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.
وَقَالَ: «هَأَنَذَا أُعَرِّفُكَ مَا يَكُونُ فِي آخِرِ ٱلسُّخَطِ. لِأَنَّ لِمِيعَادِ ٱلِٱنْتِهَاءَ. ١٩ 19
१९तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.
أَمَّا ٱلْكَبْشُ ٱلَّذِي رَأَيْتَهُ ذَا ٱلْقَرْنَيْنِ فَهُوَ مُلُوكُ مَادِي وَفَارِسَ. ٢٠ 20
२०जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत.
وَٱلتَّيْسُ ٱلْعَافِي مَلِكُ ٱلْيُونَانِ، وَٱلْقَرْنُ ٱلْعَظِيمُ ٱلَّذِي بَيْنَ عَيْنَيْهِ هُوَ ٱلْمَلِكُ ٱلْأَوَّلُ. ٢١ 21
२१तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.
وَإِذِ ٱنْكَسَرَ وَقَامَ أَرْبَعَةٌ عِوَضًا عَنْهُ، فَسَتَقُومُ أَرْبَعُ مَمَالِكَ مِنَ ٱلْأُمَّةِ، وَلَكِنْ لَيْسَ فِي قُوَّتِهِ. ٢٢ 22
२२जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार.
وَفِي آخِرِ مَمْلَكَتِهِمْ عِنْدَ تَمَامِ ٱلْمَعَاصِي يَقُومُ مَلِكٌ جَافِي ٱلْوَجْهِ وَفَاهِمُ ٱلْحِيَلِ. ٢٣ 23
२३त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.
وَتَعْظُمُ قُوَّتُهُ، وَلَكِنْ لَيْسَ بِقُوَّتِهِ. يُهْلِكُ عَجَبًا وَيَنْجَحُ وَيَفْعَلُ وَيُبِيدُ ٱلْعُظَمَاءَ وَشَعْبَ ٱلْقِدِّيسِينَ. ٢٤ 24
२४त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.
وَبِحَذَاقَتِهِ يَنْجَحُ أَيْضًا ٱلْمَكْرُ فِي يَدِهِ، وَيَتَعَظَّمُ بِقَلْبِهِ. وَفِي ٱلِٱطْمِئْنَانِ يُهْلِكُ كَثِيرِينَ، وَيَقُومُ عَلَى رَئِيسِ ٱلرُّؤَسَاءِ، وَبِلَا يَدٍ يَنْكَسِرُ. ٢٥ 25
२५तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतींच्या अधिपतींविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याच्या बलाने नाही.
فَرُؤْيَا ٱلْمَسَاءِ وَٱلصَّبَاحِ ٱلَّتِي قِيلَتْ هِيَ حَقٌّ. أَمَّا أَنْتَ فَٱكْتُمِ ٱلرُّؤْيَا لِأَنَّهَا إِلَى أَيَّامٍ كَثِيرَةٍ». ٢٦ 26
२६हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”
وَأَنَا دَانِيآلَ ضَعُفْتُ وَنَحَلْتُ أَيَّامًا، ثُمَّ قُمْتُ وَبَاشَرْتُ أَعْمَالَ ٱلْمَلِكِ، وَكُنْتُ مُتَحَيِّرًا مِنَ ٱلرُّؤْيَا وَلَا فَاهِمَ. ٢٧ 27
२७तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्यास समजणारा कोणीच नव्हता.

< دَانِيآل 8 >