< ٢ أخبار 30 >

وَأَرْسَلَ حَزَقِيَّا إِلَى جَمِيعِ إِسْرَائِيلَ وَيَهُوذَا، وَكَتَبَ أَيْضًا رَسَائِلَ إِلَى أَفْرَايِمَ وَمَنَسَّى أَنْ يَأْتُوا إِلَى بَيْتِ ٱلرَّبِّ فِي أُورُشَلِيمَ لِيَعْمَلُوا فِصْحًا لِلرَّبِّ إِلَهِ إِسْرَائِيلَ. ١ 1
हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले.
فَتَشَاوَرَ ٱلْمَلِكُ وَرُؤَسَاؤُهُ وَكُلُّ ٱلْجَمَاعَةِ فِي أُورُشَلِيمَ أَنْ يَعْمَلُوا ٱلْفِصْحَ فِي ٱلشَّهْرِ ٱلثَّانِي، ٢ 2
यरूशलेम येथील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करून राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले.
لِأَنَّهُمْ لَمْ يَقْدِرُوا أَنْ يَعْمَلُوهُ فِي ذَلِكَ ٱلْوَقْتِ، لِأَنَّ ٱلْكَهَنَةَ لَمْ يَتَقَدَّسُوا بِٱلْكِفَايَةِ، وَٱلشَّعْبَ لَمْ يَجْتَمِعُوا إِلَى أُورُشَلِيمَ. ٣ 3
सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरूशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते.
فَحَسُنَ ٱلْأَمْرُ فِي عَيْنَيِ ٱلْمَلِكِ وَعُيُونِ كُلِّ ٱلْجَمَاعَةِ. ٤ 4
तेव्हा राजासह सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली.
فَٱعْتَمَدُوا عَلَى إِطْلَاقِ ٱلنِّدَاءِ فِي جَمِيعِ إِسْرَائِيلَ مِنْ بِئْرِ سَبْعٍ إِلَى دَانَ أَنْ يَأْتُوا لِعَمَلِ ٱلْفِصْحِ لِلرَّبِّ إِلَهِ إِسْرَائِيلَ فِي أُورُشَلِيمَ، لِأَنَّهُمْ لَمْ يَعْمَلُوهُ كَمَا هُوَ مَكْتُوبٌ مُنْذُ زَمَانٍ كَثِيرٍ. ٥ 5
बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.
فَذَهَبَ ٱلسُّعَاةُ بِٱلرَّسَائِلِ مِنْ يَدِ ٱلْمَلِكِ وَرُؤَسَائِهِ فِي جَمِيعِ إِسْرَائِيلَ وَيَهُوذَا، وَحَسَبَ وَصِيَّةِ ٱلْمَلِكِ كَانُوا يَقُولُونَ: «يَا بَنِي إِسْرَائِيلَ، ٱرْجِعُوا إِلَى ٱلرَّبِّ إِلَهِ إِبْرَاهِيمَ وَإِسْحَاقَ وَإِسْرَائِيلَ، فَيَرْجِعَ إِلَى ٱلنَّاجِينَ ٱلْبَاقِينَ لَكُمْ مِنْ يَدِ مُلُوكِ أَشُّورَ. ٦ 6
त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता: “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.
وَلَا تَكُونُوا كَآبَائِكُمْ وَكَإِخْوَتِكُمُ ٱلَّذِينَ خَانُوا ٱلرَّبَّ إِلَهَ آبَائِهِمْ فَجَعَلَهُمْ دَهْشَةً كَمَا أَنْتُمْ تَرَوْنَ. ٧ 7
आपले पिता किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच.
ٱلْآنَ لَا تُصَلِّبُوا رِقَابَكُمْ كَآبَائِكُمْ، بَلِ ٱخْضَعُوا لِلرَّبِّ وَٱدْخُلُوا مَقْدِسَهُ ٱلَّذِي قَدَّسَهُ إِلَى ٱلْأَبَدِ، وَٱعْبُدُوا ٱلرَّبَّ إِلَهَكُمْ فَيَرْتَدَّ عَنْكُمْ حُمُوُّ غَضَبِهِ. ٨ 8
आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वरास शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल.
لِأَنَّهُ بِرُجُوعِكُمْ إِلَى ٱلرَّبِّ يَجِدُ إِخْوَتُكُمْ وَبَنُوكُمْ رَحْمَةً أَمَامَ ٱلَّذِينَ يَسْبُونَهُمْ، فَيَرْجِعُونَ إِلَى هَذِهِ ٱلْأَرْضِ، لِأَنَّ ٱلرَّبَّ إِلَهَكُمْ حَنَّانٌ وَرَحِيمٌ، وَلَا يُحَوِّلُ وَجْهَهُ عَنْكُمْ إِذَا رَجَعْتُمْ إِلَيْهِ». ٩ 9
तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”
فَكَانَ ٱلسُّعَاةُ يَعْبُرُونَ مِنْ مَدِينَةٍ إِلَى مَدِينَةٍ فِي أَرْضِ أَفْرَايِمَ وَمَنَسَّى حَتَّى زَبُولُونَ، فَكَانُوا يَضْحَكُونَ عَلَيْهِمْ وَيَهْزَأُونَ بِهِمْ. ١٠ 10
१०एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोपे गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली.
إِلَّا إِنَّ قَوْمًا مِنْ أَشِيرَ وَمَنَسَّى وَزَبُولُونَ تَوَاضَعُوا وَأَتَوْا إِلَى أُورُشَلِيمَ. ١١ 11
११आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरूशलेमेला प्रयाण केले.
وَكَانَتْ يَدُ ٱللهِ فِي يَهُوذَا أَيْضًا، فَأَعْطَاهُمْ قَلْبًا وَاحِدًا لِيَعْمَلُوا بِأَمْرِ ٱلْمَلِكِ وَٱلرُّؤَسَاءِ، حَسَبَ قَوْلِ ٱلرَّبِّ. ١٢ 12
१२पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रीतीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
فَٱجْتَمَعَ إِلَى أُورُشَلِيمَ شَعْبٌ كَثِيرٌ لِعَمَلِ عِيدِ ٱلْفَطِيرِ فِي ٱلشَّهْرِ ٱلثَّانِي، جَمَاعَةٌ كَثِيرَةٌ جِدًّا. ١٣ 13
१३दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरूशलेमेत जमले. तो एक विशाल समुदाय होता.
وَقَامُوا وَأَزَالُوا ٱلْمَذَابِحَ ٱلَّتِي فِي أُورُشَلِيمَ، وَأَزَالُوا كُلَّ مَذَابِحِ ٱلتَّبْخِيرِ وَطَرَحُوهَا إِلَى وَادِي قَدْرُونَ. ١٤ 14
१४यरूशलेम मधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या.
وَذَبَحُوا ٱلْفِصْحَ فِي ٱلرَّابِعِ عَشَرَ مِنَ ٱلشَّهْرِ ٱلثَّانِي. وَٱلْكَهَنَةُ وَٱللَّاوِيُّونَ خَجِلُوا وَتَقَدَّسُوا وَأَدْخَلُوا ٱلْمُحْرَقَاتِ إِلَى بَيْتِ ٱلرَّبِّ، ١٥ 15
१५दुसऱ्या माहिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बली दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वत: ला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
وَأَقَامُوا عَلَى مَقَامِهِمْ حَسَبَ حُكْمِهِمْ كَنَامُوسِ مُوسَى رَجُلِ ٱللهِ. كَانَ ٱلْكَهَنَةُ يَرُشُّونَ ٱلدَّمَ مِنْ يَدِ ٱللَّاوِيِّينَ. ١٦ 16
१६देवाचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवीच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले.
لِأَنَّهُ كَانَ كَثِيرُونَ فِي ٱلْجَمَاعَةِ لَمْ يَتَقَدَّسُوا، فَكَانَ ٱللَّاوِيُّونَ عَلَى ذَبْحِ ٱلْفِصْحِ عَنْ كُلِّ مَنْ لَيْسَ بِطَاهِرٍ لِتَقْدِيسِهِمْ لِلرَّبِّ. ١٧ 17
१७येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत: चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.
لِأَنَّ كَثِيرِينَ مِنَ ٱلشَّعْبِ، كَثِيرِينَ مِنْ أَفْرَايِمَ وَمَنَسَّى وَيَسَّاكَرَ وَزَبُولُونَ لَمْ يَتَطَهَّرُوا، بَلْ أَكَلُوا ٱلْفِصْحَ لَيْسَ كَمَا هُوَ مَكْتُوبٌ. إِلَّا إِنَّ حَزَقِيَّا صَلَّى عَنْهُمْ قَائِلًا: «ٱلرَّبُّ ٱلصَّالِحُ يُكَفِّرُ عَنْ ١٨ 18
१८एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत: चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.
كُلِّ مَنْ هَيَّأَ قَلْبَهُ لِطَلَبِ ٱللهِ ٱلرَّبِّ إِلَهِ آبَائِهِ، وَلَيْسَ كَطَهَارَةِ ٱلْقُدْسِ». ١٩ 19
१९तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
فَسَمِعَ ٱلرَّبُّ لِحَزَقِيَّا وَشَفَى ٱلشَّعْبَ. ٢٠ 20
२०राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांस क्षमा केली.
وَعَمِلَ بَنُو إِسْرَائِيلَ ٱلْمَوْجُودُونَ فِي أُورُشَلِيمَ عِيدَ ٱلْفَطِيرِ سَبْعَةَ أَيَّامٍ بِفَرَحٍ عَظِيمٍ، وَكَانَ ٱللَّاوِيُّونَ وَٱلْكَهَنَةُ يُسَبِّحُونَ ٱلرَّبَّ يَوْمًا فَيَوْمًا بِآلَاتِ حَمْدٍ لِلرَّبِّ. ٢١ 21
२१इस्राएलाच्या प्रजेने यरूशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन: पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईली.
وَطَيَّبَ حَزَقِيَّا قُلُوبَ جَمِيعِ ٱللَّاوِيِّينَ ٱلْفَطِنِينَ فِطْنَةً صَالِحَةً لِلرَّبِّ، وَأَكَلُوا ٱلْمَوْسِمَ سَبْعَةَ أَيَّامٍ يَذْبَحُونَ ذَبَائِحَ سَلَامَةٍ وَيَحْمَدُونَ ٱلرَّبَّ إِلَهَ آبَائِهِمْ. ٢٢ 22
२२परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांत्यर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवासमोर पापाची कबूली दिली.
وَتَشَاوَرَ كُلُّ ٱلْجَمَاعَةِ أَنْ يَعْمَلُوا سَبْعَةَ أَيَّامٍ أُخْرَى، فَعَمِلُوا سَبْعَةَ أَيَّامٍ بِفَرَحٍ. ٢٣ 23
२३वल्हांडणाचा सण आणखी सात दिवस साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने साजरा केला.
لِأَنَّ حَزَقِيَّا مَلِكَ يَهُوذَا قَدَّمَ لِلْجَمَاعَةِ أَلْفَ ثَوْرٍ وَسَبْعَةَ آلَافٍ مِنَ ٱلضَّأْنِ، وَٱلرُّؤَسَاءُ قَدَّمُوا لِلْجَمَاعَةِ أَلْفَ ثَوْرٍ وَعَشَرَةَ آلَافٍ مِنَ ٱلضَّأْنِ، وَتَقَدَّسَ كَثِيرُونَ مِنَ ٱلْكَهَنَةِ. ٢٤ 24
२४यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे व पुढाऱ्यांनी एक हजार बैल व दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले.
وَفَرِحَ كُلُّ جَمَاعَةِ يَهُوذَا، وَٱلْكَهَنَةُ وَٱللَّاوِيُّونَ، وَكُلُّ ٱلْجَمَاعَةِ ٱلْآتِينَ مِنْ إِسْرَائِيلَ، وَٱلْغُرَبَاءُ ٱلْآتُونَ مِنْ أَرْضِ إِسْرَائِيلَ وَٱلسَّاكِنُونَ فِي يَهُوذَا. ٢٥ 25
२५यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलातून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते.
وَكَانَ فَرَحٌ عَظِيمٌ فِي أُورُشَلِيمَ، لِأَنَّهُ مِنْ أَيَّامِ سُلَيْمَانَ بْنِ دَاوُدَ مَلِكِ إِسْرَائِيلَ لَمْ يَكُنْ كَهَذَا فِي أُورُشَلِيمَ. ٢٦ 26
२६यरूशलेमामध्ये आनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा पुत्र शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता.
وَقَامَ ٱلْكَهَنَةُ ٱللَّاوِيُّونَ وَبَارَكُوا ٱلشَّعْبَ، فَسُمِعَ صَوْتُهُمْ وَدَخَلَتْ صَلَاتُهُمْ إِلَى مَسْكَنِ قُدْسِهِ إِلَى ٱلسَّمَاءِ. ٢٧ 27
२७याजक व लेवी यांनी उठून लोकांस आशीर्वाद देण्याची परमेश्वरास प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वरास ऐकू गेली.

< ٢ أخبار 30 >