< ١ أخبار 24 >

وَهَذِهِ فِرَقُ بَنِي هَارُونَ: بَنُو هَارُونَ: نَادَابُ وَأَبِيهُو، أَلِعَازَارُ وَإِيثَامَارُ. ١ 1
अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
وَمَاتَ نَادَابُ وَأَبِيهُو قَبْلَ أَبِيهِمَا وَلَمْ يَكُنْ لَهُمَا بَنُونَ، فَكَهَنَ أَلِعَازَارُ وَإِيثَامَارُ. ٢ 2
पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
وَقَسَمَهُمْ دَاوُدُ وَصَادُوقُ مِنْ بَنِي أَلِعَازَارَ، وَأَخِيمَالِكَ مِنْ بَنِي إِيثَامَارَ، حَسَبَ وَكَالَتِهِمْ فِي خِدْمَتِهِمْ. ٣ 3
दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
وَوُجِدَ لِبَنِي أَلِعَازَارَ رُؤُوسُ رِجَالٍ أَكْثَرَ مِنْ بَنِي إِيثَامَارَ، فَٱنْقَسَمُوا لِبَنِي أَلِعَازَارَ رُؤُوسًا لِبَيْتِ آبَائِهِمْ سِتَّةَ عَشَرَ، وَلِبَنِي إِيثَامَارَ لِبَيْتِ آبَائِهِمْ ثَمَانِيَةٌ. ٤ 4
इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
وَٱنْقَسَمُوا بِٱلْقُرْعَةِ، هَؤُلَاءِ مَعَ هَؤُلَاءِ، لِأَنَّ رُؤَسَاءَ ٱلْقُدْسِ وَرُؤَسَاءَ بَيْتِ ٱللهِ كَانُوا مِنْ بَنِي أَلِعَازَارَ وَمِنْ بَنِي إِيثَامَارَ. ٥ 5
दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
وَكَتَبَهُمْ شَمَعْيَا بْنُ نَثَنْئِيلَ ٱلْكَاتِبُ مِنَ ٱللَّاوِيِّينَ أَمَامَ ٱلْمَلِكِ وَٱلرُّؤَسَاءِ وَصَادُوقَ ٱلْكَاهِنِ وَأَخِيمَالِكَ بْنِ أَبِيَاثَارَ وَرُؤُوسِ ٱلْآبَاءِ لِلْكَهَنَةِ وَٱللَّاوِيِّينَ. فَأُخِذَ بَيْتُ أَبٍ وَاحِدٍ لِأَلِعَازَارَ، وَأُخِذَ وَاحِدٌ لِإِيثَامَارَ. ٦ 6
आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
فَخَرَجَتِ ٱلْقُرْعَةُ ٱلْأُولَى لِيَهُويَارِيبَ. ٱلثَّانِيَةُ لِيَدْعِيَا. ٧ 7
पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
ٱلثَّالِثَةُ لِحَارِيمَ. ٱلرَّابِعَةُ لِسَعُورِيمَ. ٨ 8
तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
ٱلْخَامِسَةُ لِمَلْكِيَّا. ٱلسَّادِسَةُ لِمَيَّامِينَ. ٩ 9
पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
ٱلسَّابِعَةُ لِهُقُّوصَ. ٱلثَّامِنَةُ لِأَبِيَّا. ١٠ 10
१०सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
ٱلتَّاسِعَةُ لِيَشُوعَ. ٱلْعَاشِرَةُ لِشَكُنْيَا. ١١ 11
११नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
ٱلْحَادِيَةَ عَشَرَةَ لِأَلِيَاشِيبَ. ٱلثَّانِيَةَ عَشَرَةَ لِيَاقِيمَ. ١٢ 12
१२अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
ٱلثَّالِثَةَ عَشَرَةَ لِحُفَّةَ. ٱلرَّابِعَةَ عَشَرَةَ لِيَشَبْآبَ. ١٣ 13
१३तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
ٱلْخَامِسَةَ عَشَرَةَ لِبَلْجَةَ. ٱلسَّادِسَةَ عَشَرَةَ لِإِيمِيرَ. ١٤ 14
१४पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची.
ٱلسَّابِعَةَ عَشَرَةَ لِحِيزِيرَ. ٱلثَّامِنَةَ عَشَرَةَ لِهَفْصِيصَ. ١٥ 15
१५सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
ٱلتَّاسِعَةَ عَشَرَةَ لِفَقَحْيَا. ٱلْعِشْرُونَ لِيَحَزْقِيئِيلَ. ١٦ 16
१६एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
ٱلْحَادِيَةُ وَٱلْعِشْرُونَ لِيَاكِينَ. ٱلثَّانِيةُ وَٱلْعِشْرُونَ لِجَامُولَ. ١٧ 17
१७एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
ٱلثَّالِثَةُ وَٱلْعِشْرُونَ لِدَلَايَا. ٱلرَّابِعَةُ وَٱلْعِشْرُونَ لِمَعَزْيَا. ١٨ 18
१८तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
فَهَذِهِ وَكَالَتُهُمْ وَخِدْمَتُهُمْ لِلدُّخُولِ إِلَى بَيْتِ ٱلرَّبِّ حَسَبَ حُكْمِهِمْ عَنْ يَدِ هَارُونَ أَبِيهِمْ كَمَا أَمَرَهُ ٱلرَّبُّ إِلَهُ إِسْرَائِيلَ. ١٩ 19
१९परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
وَأَمَّا بَنُو لَاوِي ٱلْبَاقُونَ: فَمِنْ بَنِي عَمْرَامَ: شُوبَائِيلُ، وَمِنْ بَنِي شُوبَائِيلَ: يَحَدْيَا. ٢٠ 20
२०लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.
وَأَمَّا رَحَبْيَا، فَمِنْ بَنِي رَحَبْيَا: ٱلرَّأْسُ يَشِّيَّا. ٢١ 21
२१रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
وَمِنَ ٱلْيِصْهَارِيِّينَ: شَلُومُوثُ، وَمِنْ بَنِي شَلُومُوثَ: يَحَثُ. ٢٢ 22
२२इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
وَمِنْ بَنِي حَبْرُونَ: يَرِيَّا وَأَمَرْيَا ٱلثَّانِي وَيَحْزِيئِيلُ ٱلثَّالِثُ وَيَقْمَعَامُ ٱلرَّابِعُ. ٢٣ 23
२३हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
مِنْ بَنِي عُزِّيئِيلَ: مِيخَا. مِنْ بَنِي مِيخَا: شَامُورُ. ٢٤ 24
२४उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
أَخُو مِيخَا: يِشِّيَّا، وَمِنْ بَنِي يِشِّيَّا: زَكَرِيَّا. ٢٥ 25
२५मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
اِبْنَا مَرَارِي: مَحْلِي وَمُوشِي. اِبْنُ يَعَزْيَا بَنُو. ٢٦ 26
२६मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
مِنْ بَنِي مَرَارِي لِيَعَزْيَا: بَنُو وَشُوهَمُ وَزَكُّورُ وَعِبْرِي. ٢٧ 27
२७मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
مِنْ مَحْلِي: أَلِعَازَارُ وَلَمْ يَكُنْ لَهُ بَنُونَ. ٢٨ 28
२८महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
وَأَمَّا قَيْسُ، فَٱبْنُ قَيْسَ يَرْحَمْئِيلُ. ٢٩ 29
२९कीशाचे वंशज: यरहमेल.
وَبَنُو مُوشِي: مَحْلِي وَعَادِرُ وَيَرِيمُوثُ. هَؤُلَاءِ بَنُو ٱللَّاوِيِّينَ حَسَبَ بُيُوتِ آبَائِهِمْ. ٣٠ 30
३०महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
وَأَلْقَوْا هُمْ أَيْضًا قُرَعًا مُقَابِلَ إِخْوَتِهِمْ بَنِي هَارُونَ أَمَامَ دَاوُدَ ٱلْمَلِكِ وَصَادُوقَ وَأَخِيمَالِكَ وَرُؤُوسِ آبَاءِ ٱلْكَهَنَةِ وَٱللَّاوِيِّينَ. ٱلْآبَاءُ ٱلرُّؤُوسُ كَمَا إِخْوَتِهِمِ ٱلْأَصَاغِرِ. ٣١ 31
३१राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.

< ١ أخبار 24 >