< मत्तय 18 >

1 त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? 2 तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; 3 मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. 4 यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई; 5 अनी जो कोणी मना नावतीन असा धाकला पोऱ्याले जवळ करी त्यानी माले जोडे करं अस व्हई 6 अनी जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन समुद्रमा खोल पाणीमा बुडाई देवाणं यामा त्यानं हित शे. 7 आडफाटासमुये जगना धिक्कार असो! आडफाटा तर येतीनच, पण जो माणुस आडफाटा लई, त्याना धिक्कार असो! 8 तुना हात किंवा तुना पाय तुले आडफाटा करी तर त्या तोडीन फेकी दे; दोन हात किंवा दोन पाय राहिसन सार्वकालिक अग्नीमा पडापेक्षा लंगडा व्हईसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. (aiōnios g166) 9 तुना डोयानी आडफाटा करा, तर तो उपटी टाक; दोन डोया राहिसन अग्नीनरकमा पडापेक्षा एक डोया राहीसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. (Geenna g1067) 10 “दखा, तुम्हीन ह्या धाकला लेकरंसपैकी एकले बी तुच्छ मानु नका; कारण, मी तुमले सांगस की, स्वर्गमा त्यासना देवदूत मना स्वर्ग माधला बापनं तोंड कायम दखतस.” 11 आखो ज्या दवडायेल शेतस त्यासनं तारण कराले मनुष्यना पोऱ्या येल शे. 12 तुमले काय वाटस; जर एक माणुसजोडे शंभर मेंढरं शेतस अनी त्यामातीन एक मेंढरू दवडी गयं, तर तो माणुस त्या नव्यान्नव मेंढरसले डोंगरवर सोडीन त्या दवडेल मेंढरूले दखाले जावाव नही का? 13 कदाचित ते त्याले सापडनं तर, त्यानाकडे ज्या नव्यान्नव मेंढरं सुरक्षित व्हतात त्यासनापेक्षा जास्त आनंद त्याले ते मेंढरू सापडावर व्हई, हाई मी तुमले सत्य सांगस. 14 तसच ह्या धाकलासनामाधला कोणाच नाश व्हवाले नको अशी तुमना स्वर्ग माधला बापनी ईच्छा शे. 15 जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. 16 पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन. 17 अनी जर त्यानी त्यासनं बी ऐकं नही तर मंडळीले सांग; अनी त्यानी मंडळीनं बी नही ऐकं तर, तो तुनासाठे एक जकातदार किंवा परकानामायक व्हवो. 18 मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई. 19 आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई; 20 कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे. 21 तवय पेत्र येशुकडे ईसन बोलना, प्रभुजी मना भाऊनी मनाविरूध्द अपराध करा, तर मी त्याले कितला दाव माफ करू? सात दाव का? 22 येशुनी त्याले सांगं, मी तुले अस नही म्हणस की, सात दाव, तर सातना सत्तरदाव कर. 23 यामुये स्वर्गनं राज्य एक राजाना मायक शे; त्या राजाले आपला सेवकसकडतीन हिशोब ल्यावा अस वाटनं; 24 अनी जवय तो हिशोब ली राहिंता तवय ज्यानावर कोटी रूपया कर्ज व्हतं त्याले त्यानाकडे आणं. 25 पण त्यान्याकडे कर्ज फेडाले काहीच नव्हतं म्हणीन त्याना मालकनी हुकूम करा की, त्यानी बायको, पोऱ्या अनं त्यानं जे काही व्हई ते ईकीसन त्यानी कर्ज फेडानं. 26 तवय त्या दासनी त्याना पाया पडीसन सांगं, माले वागाडी ल्या, म्हणजे मी सर्वकाही फेडी दिसु 27 तवय त्या धनीले त्यानी दया वनी अनी त्यानी त्याले अनं त्यानं कर्ज बी माफ करी दिधं. 28 तो सेवक बाहेर गया अनी ज्यानाकडे त्याना शंभर दिनार रूपया बाकी व्हतात असा त्याना जोडीना सेवक त्याले दखायना, तवय त्यानी त्या सेवकनी गचांडी धरीन बोलना, तुनाकडे मनं जे लेणं शे ते दे. 29 त्या सेवकनी पाया पडीन रावण्या करात, माले वागाडी ले, म्हणजे तुनं देणं मी फेडी दिसु; 30 पण त्यानी त्यानं अजिबात ऐक नही तो कर्ज फेडत नही तोपावत त्यानी त्याले बंदिगृहमा टाकी दिधं. 31 तवय हाऊ घडेल प्रकार दखीसन त्यानासंगेना सेवकसले दुःख व्हयनं अनी त्यासनी ईसन सर्वा प्रकार आपला मालकले सांगा. 32 तवय त्याना मालकनी त्याले बलाईन सांगं, अरे दुष्ट सेवका, तु माले ईनंती करी अनी मी तुनं सर्व कर्ज माफ करं; 33 जशी दया मी तुनावर करी, तशी तुले तुना जोडीदार सेवकवर करता नही वनी का? 34 मंग त्याना मालकनी संतापमा त्याले सर्व कर्ज फेडस तोपावत शिक्षा भोगाकरता बंदीगृहाना ताबामा दिधं. 35 जर तुम्हीन प्रत्येक आपापला बंधुजणसले मनपाईन माफ कराव नही, तर मना स्वर्ग माधला बाप बी तुमनासंगे तसच करी.

< मत्तय 18 >